एक्स्प्लोर

अकोल्यात मृत शेतकऱ्याच्या नावे तूर खरेदी

अकोला: राज्यभरात तूर खरेदी गाजलीय ती गडबड आणि गोंधळामुळे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे नाफेडनं कहरच केला आहे. येथील खरेदी केंद्रावर चक्क मृत  शेतकऱ्याच्या नावाने तूर खरेदी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तालुक्यातील वाकोडी येथील मयत शेतकरी बळीराम सदाशिव येवले यांच्या नावानं ही तूर खरेदी दाखवण्यात आली आहे. बळीराम येवले यांचे 3 ऑगस्ट 2014 ला निधन झालं आहे. मात्र, 22 एप्रिल रोजी त्यांच्या नावावर 14 क्विंटल तुरीचे मोजमाप करण्यात आले. बळीराम यांच्या नावानं एखाद्या व्यापाऱ्यांनं आपली तूर येथे विकल्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यभरात तूर खरेदी यंत्रणेला हाताशी धरून व्यापाऱ्यांनी आपलं उखळ तर पांढरं केलं नाही ना?, हा प्रश्न यातून निर्माण होतोय. तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु असलेल्या नाफेडच्या केंद्रावर अनेक गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या होत्या. या तक्रारीवर याप्रकारामुळे शिक्कामोर्तब झालं. तेल्हारा येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर येथील कर्मचाऱ्यांनी मनमानी करीत व्यापाऱ्यांची चांदी केल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. यातूनच तूर खरेदी बंद होण्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये बाजार समितीने जवळच्या शेतकऱ्यांना पुरवणी टोकन दिली. यामुळे आधी आलेले शेतकरी तूर मोजणीपासून वंचित राहिलेले आहेत. नाफेडमध्ये तूर आणताना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशपत्रिका भरून घेते. त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव, गट क्रमांक, दाखला दिनांक अशी माहिती भरली जाते.  परंतु बळीराम येवले यांचे टोकन क्रमांक 594 वरून पुरवणी टोकन म्हणून 189 क्रमाकांचे टोकन देण्यात आले. या पावतीवर किती माल आणला, त्याची माहिती नाही. वाहनाचा क्रमांक एमएच 28 असा अर्धवट आहे. त्या माहितीवरच तुरीचे मोजमाप करण्यात आले, तसेच 794 क्रमांकाच्या एकाच टोकनवरून चार पुरवणी टोकन वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे तेल्हारा येथील तूर खरेदी केंद्रावरील हा प्रकार शेतकऱ्यांच्या नावावर यंत्रणेला हाताशी धरुन व्यापाऱ्यांची चांदी करणारं रॅकेट ठिकठिकाणी कार्यरत असल्याच्या चर्चेला बळ मिळतंय. तेल्हाऱ्यातील या प्रकारावर काय कारवाई आणि चौकशी होणार यासंदर्भात कुणाकडूनच माहिती मिळू शकली नाही. मुख्यमंत्र्यांनी 22 एप्रिलपर्यंत आलेली तूर खरेदी करणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी अकोल्यातील पाचही खरेदी केंद्रांवर अद्याप तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यात अद्यापही खरेदी केंद्रांवर 1 लाख क्विंटल तूर पडून आहे. त्यामुळे तूर खरेदी नेमके कधी होणार या विचारानं शेतकरी हवालदिल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 October 2026: आजचा शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Mumbai Art Gallery : मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे भव्य दालन उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे भव्य दालन उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
तरुणांचा, नागरिकांचा आवाज ऐकलाच पाहिजे, TMC चे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांचं वक्तव्य, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशातील वातावरण तापलं 
तरुणांचा, नागरिकांचा आवाज ऐकलाच पाहिजे, TMC चे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांचं वक्तव्य, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशातील वातावरण तापलं 
China Border Tension : भारताचे इंटेलिजन्स समजून घ्यायचे असेल तर 'धुरंधर' सिनेमा पाहा; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला, शशी थरूर म्हणाले...
भारताचे इंटेलिजन्स समजून घ्यायचे असेल तर 'धुरंधर' सिनेमा पाहा; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला, शशी थरूर म्हणाले...

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget