एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या बीड दौऱ्यात पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती; धनंजय मुंडेंच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स कायम!

Ajit Pawar : अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात पंकजा मुंडे या देखील सोबत असणार असल्याचे  समोर आले आहे. मात्र बीडच्या डीपीडिसी बैठकीत धनंजय मुंडे उपस्थित राहणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) बीड (Beed) दौऱ्याबाबत मोठी बातमी पुढे आली आहे. अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) या देखील सोबत असणार असल्याचे  समोर आले आहे. अजित पवार आणि पंकजा मुंडे आज(29 जानेवारीला) एकाच विमानाने संभाजीनगरला पोहचणार असल्याचे ही बोलले जात आहे. तर उद्या म्हणजेच 30 जानेवारीच्या बीडच्या डीपीडीसी बैठकीत अजित पवारांसह पंकजा मुंडे देखील उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकीकडे वाल्मिक कराडचा पाय खोलात जात असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावरही सतत टीका केली जात आहे. मकोका लागलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढतच चालला आहे. अशातच उद्याच्या बीडच्या डीपीडिसी बैठकीत धनंजय मुंडे उपस्थित राहणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 

अजित पवारांकडून जिल्हा बँकेच्या संदर्भात बैठक

दुसरीकडे राज्याचे उपमुखमंत्री अजित पवारांच्या मंत्रालयातील दालनात आज (29 जानेवारी) बीड आणि नाशिक जिल्हा बँकेच्या संदर्भात बैठक पार पडली. या बीडच्या डीपीडीसी बैठकी आधी मंत्री पंकजा मुंडे यांनी अजित पवारांचे भेट घेतलीय. तसेच मंत्री माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांची ही उपमुखमंत्री अजित पवार यांच्यासोबत नाशिक जिल्हा बँक प्रकरणी बैठक पार पडली. नाशिक जिल्हा बँक अडचणीत असल्यामूळ हे लोकप्रतिनिधी उपमुखमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्याचे ही बोलले जात आहे. निवडणुक काळात अजित पवारांकडून संबंधित बँका आर्थिक अडचणीतून बाहेर काढू, असं आश्वासन देण्यात आलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून कर्ज आणि परतफेड यांचा ताळमेळ बसत नसल्याने सरकारने नाशिक बँकेवर निर्बंध लादले आहेत. परिणामी खातेदार, सहकारी सोसायट्या पैसे मिळत नसल्याने अडचणीत आहेत. बीड जिल्हा बँकेत देखील अनेक घोटाळे उघडकीस आल्यामुळे बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. दरम्यान, बीड बँकेच आजारपण दूर करण्यासाठी 500 कोटींची तर नाशिक जिल्हा बँकेला 650 कोटींची गरज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील अडचणीत असलेल्या बँका संदर्भात अजित पवार काही महत्वपूर्ण निर्णय घेणार का याकडे आता सऱ्यांचे लक्ष लागले आहे.   

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uniform Civil Code : आता आणखी एका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी; मसुदा तयार करण्यासाठी 5 सदस्यीय समिती, 45 दिवसात अहवाल मागितला
आता आणखी एका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी; मसुदा तयार करण्यासाठी 5 सदस्यीय समिती, 45 दिवसात अहवाल मागितला
ई-वे बिल रद्द करण्यासाठी 6 आवश्यक टिपा
ई-वे बिल रद्द करण्यासाठी 6 आवश्यक टिपा
Sanjay Raut : कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत 2000 भाविकांचा मृत्यू; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले, सीसीटीव्हीचं फुटेज...
कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत 2000 भाविकांचा मृत्यू; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले, सीसीटीव्हीचं फुटेज...
European Union on Donald Trump : तर ट्रम्प आम्हाला खाऊन टाकतील! डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकी सत्रावर युरोपमधून आवाज आलाच, पहिला निर्णय घेतला
तर ट्रम्प आम्हाला खाऊन टाकतील! डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकी सत्रावर युरोपमधून आवाज आलाच, पहिला निर्णय घेतला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपींना पुन्हा एकदा रिमांडमध्ये घ्याABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 05 February 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सLaxman Hake : अंजलीताई दमानिया यांचं नाव अंजली 'दलालिया' ठेवावं..- हाकेNana Patole Full PC : शिवरायांबद्दल चुकीचं बोलणाऱ्याला कुत्रा म्हटलं पाहिजे,सोलापुरकरांवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uniform Civil Code : आता आणखी एका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी; मसुदा तयार करण्यासाठी 5 सदस्यीय समिती, 45 दिवसात अहवाल मागितला
आता आणखी एका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी; मसुदा तयार करण्यासाठी 5 सदस्यीय समिती, 45 दिवसात अहवाल मागितला
ई-वे बिल रद्द करण्यासाठी 6 आवश्यक टिपा
ई-वे बिल रद्द करण्यासाठी 6 आवश्यक टिपा
Sanjay Raut : कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत 2000 भाविकांचा मृत्यू; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले, सीसीटीव्हीचं फुटेज...
कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत 2000 भाविकांचा मृत्यू; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले, सीसीटीव्हीचं फुटेज...
European Union on Donald Trump : तर ट्रम्प आम्हाला खाऊन टाकतील! डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकी सत्रावर युरोपमधून आवाज आलाच, पहिला निर्णय घेतला
तर ट्रम्प आम्हाला खाऊन टाकतील! डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकी सत्रावर युरोपमधून आवाज आलाच, पहिला निर्णय घेतला
Illegal Indian migrants in US : हातात बेड्या घातल्या, आरोपींप्रमाणे लष्करी विमानात डांबून 218 अवैध भारतीयांची अमेरिकेतून भारतात रवानगी!
हातात बेड्या घातल्या, आरोपींप्रमाणे लष्करी विमानात डांबून 218 अवैध भारतीयांची अमेरिकेतून भारतात रवानगी!
Devendra Fadnavis and Eknath Khadse: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट, एकनाथ खडसे रात्री अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
एकनाथ खडसे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, सागर बंगल्यावर चर्चा, राजकीय संघर्षाला तिलांजाली?
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, बड्या बिल्डरच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण, CCTV फुटेजमध्ये काळी कार दिसली
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, बड्या बिल्डरच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण, CCTV फुटेजमध्ये काळी कार दिसली
Nandurbar News : रस्ता नसल्याने महिलेची घरीच प्रसुती, बाळ दगावलं, आईची तब्येत खालावल्याने बांबूच्या झोळीतून 15 किमीचा जीवघेणा प्रवास, नंदुरबारमधील धक्कादायक घटना
रस्ता नसल्याने महिलेची घरीच प्रसुती, बाळ दगावलं, आईची तब्येत खालावल्याने बांबूच्या झोळीतून 15 किमीचा जीवघेणा प्रवास, नंदुरबारमधील धक्कादायक घटना
Embed widget