एक्स्प्लोर

Dhananjay Munde: धनंजय मुंडे दिल्लीत, राजीनाम्याचा निर्णय दिल्ली दरबारी?; राजकीय दबाव वाढला, नेमकं काय घडतंय?

Dhananjay Munde Walmik Karad: मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढत चालला आहे.

Dhananjay Munde Walmik Karad: मकोका लागलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवरच धनंजय मुंडे दिल्लीत आहेत. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे दिल्ली दौरा करत आहे. आज (29 जानेवारी) धनंजय मुंडे आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांच्यात दुपारी 12 वाजताच्या दरम्यान भेट होणार आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) आजपासून (29 जानेवारी) तीन दिवस दिल्लीत असणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस जातायत. पण  वाल्मिक कराडवरून महाराष्ट्रातला राजकीय तणाव पाहता या दौऱ्यांचा राजकीय अर्थ काढला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांची भेट घेतली. त्यामुळे आता दिल्लीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काही निर्णय होणार का, याची चर्चा सुरू आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात दीडशेहून अधिक जणांची चौकशी- 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली. यात वाल्मिक कराड यांच्या पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची चौकशी झाली आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर केज पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे. ज्याचा तपास सध्या सीआयडी तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित म्हणून एसआयटीकडून तपास सुरू आहे.

माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे भावूक-

धनंजय मुंडे काल माध्यमांशी बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. माध्यमांनी धनंजय मुंडेंना विरोधकांकडून राजीनामा मागितला जातोय, असा प्रश्न विचारला. यानंतर धनंजय मुंडे थोडे गहिवरल्याचे दिसून आले. धनंजय मुंडे म्हणाले की, ज्यावेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात, थेट तुमच्यावर आणि तुम्हाला जर लहान मूल असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना...तर त्या मुलीला तिच्या मैत्रिणी आणि मित्र काय म्हणत असतील याचा विचार करा, असं धनंजय मुंडे म्हणाले. राजीनामा या विषयावर मी काही उत्तर देणार नाही, असंही धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. 

धंनजय मुंडेंचा राजीनामा-राजकारण;अंजली दमानिया EXCLUSIVE VIDEO: 

संबंधित बातमी:

Dhananjay Munde: धनंजय मुंडे गहिवरले, थांबले; तो प्रश्न विचारताच भावूक; मंत्रालयाबाहेरील माध्यमांच्या गराड्यात काय घडलं?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Saamana Agralekh : भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपू सुलतानाचा गौरव केलाय, आता भाजप त्याच कबरीत पडलाय; 'सामना'च्या अग्रलेखातून आगपाखड
भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपू सुलतानाचा गौरव केलाय, आता भाजप त्याच कबरीत पडलाय; 'सामना'च्या अग्रलेखातून आगपाखड
Gopichand Padalkar and Ajit Pawar: अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात? गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात? गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
Gram Panchayat Band: राज्यातील ग्रामपंचायती शुक्रवारी राहणार बंद; अखिल भारतीय सरपंच परिषदेचा एल्गार, नेमकं कारण काय?
राज्यातील ग्रामपंचायती शुक्रवारी राहणार बंद; अखिल भारतीय सरपंच परिषदेचा एल्गार, नेमकं कारण काय?
Bhiwandi MahanagarPalika Mayor Election 2026: भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता

व्हिडीओ

Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saamana Agralekh : भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपू सुलतानाचा गौरव केलाय, आता भाजप त्याच कबरीत पडलाय; 'सामना'च्या अग्रलेखातून आगपाखड
भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपू सुलतानाचा गौरव केलाय, आता भाजप त्याच कबरीत पडलाय; 'सामना'च्या अग्रलेखातून आगपाखड
Gopichand Padalkar and Ajit Pawar: अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात? गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात? गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
Gram Panchayat Band: राज्यातील ग्रामपंचायती शुक्रवारी राहणार बंद; अखिल भारतीय सरपंच परिषदेचा एल्गार, नेमकं कारण काय?
राज्यातील ग्रामपंचायती शुक्रवारी राहणार बंद; अखिल भारतीय सरपंच परिषदेचा एल्गार, नेमकं कारण काय?
Bhiwandi MahanagarPalika Mayor Election 2026: भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
Nagpur News : नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
Shoaib Akhtar On Ind vs Pak: 2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
Nagpur Crime : खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Embed widget