एक्स्प्लोर

Devendra Fadnavis and Eknath Khadse: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट, एकनाथ खडसे रात्री अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्या समेट घडणार का? सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांची भेट आणि चर्चा झाली. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला पक्षांतर्गत संघर्ष म्हणून ख्याती असणाऱ्या फडणवीस-खडसे वादाला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे. कारण, एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मुंबईतील सागर बंगल्यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा सुरु झाली. या बैठकीवळी इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

राज्यात 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर काही महिन्यांमध्येच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. या संघर्षाने मध्यंतरीच्या काळात खालचे टोक गाठले होते. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड वितुष्ट निर्माण झाले होते. मध्यंतरीच्या काळात एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी एकनाथ खडसे यांनी थेट दिल्लीतील भाजपश्रेष्ठींशी संधान बांधले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रातील भाजप पक्षसंघटनेवर प्रचंड वचक असल्याने एकनाथ खडसे यांचे भाजपमधील पुनरागमन लांबले होते. मात्र, एकनाथ खडसे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक सागर बंगल्यावर दाखल झाले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आमनेसामने चर्चा झाली.  त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष संपण्याची चिन्हं दिसत आहेत. 

फडणवीसांच्या भेटीबाबत एकनाथ खडसे काय म्हणाले?

मी माझ्या मतदारसंघातील विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलो होतो. माझ्या मतदारसंघातील सहकारी तत्त्वावरील सूतगिरणी त्याच्या भागभांडवलाचा विषय होता. काही मुक्ताई मंदिराचे विषय आहेत. काही इंजिनिअरिंग कॉलेजचे विषय आहेत. याबाबत चर्चा करुन मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. बाकी राजकीय विषयावर कुठलीही चर्चा झालेली नाही, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. 

राज्यात 2014 साली भाजपची सत्ता आल्यानंतर एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रिपदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, मोदी-शाह यांनी तुलनेने नवख्या असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले होते. यानंतर 2016 च्या आसपास एकनाथ खडसे यांच्यावर एका जमीन व्यवहारात गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. त्यामुळे एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले होते. यानंतर त्यांचे मंत्रिमंडळात आणि भाजपच्या पक्षसंघटनेत कधीच पुनरागमन होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये पुन्हा सामावून घेतले जाणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती: एकनाथ खडसे

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget