Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, बड्या बिल्डरच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण, CCTV फुटेजमध्ये काळी कार दिसली
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असून गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणे, दिवसाढवळ्या खून, मारहाण, शिवीगाळ, अपहरण, चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री एका नामांकित बिल्डरच्या मुलाचं 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण (Kidnapping) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर 7 वर्षीय मुलाला वडिलांसमोरून उचलून नेल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना सिडको एन-4 परिसरातील सेंट्रल मॉलजवळ रात्री 8.40 वाजता घडली. अपहरणानंतर लगेच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर परिसरातील CCTV फुटेज तपासल्यावर मुलाला उचलून नेणारी काळी कार स्पष्ट दिसत आहे. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून पुढील काही तास या प्रकरणात महत्त्वाचे ठरणार आहेत. (Crime News)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असून गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणे, दिवसाढवळ्या खून, मारहाण, शिवीगाळ, अपहरण, चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील सिडको एन 4 भागात सेंट्रल मॉलजवळ घडलेल्या या अपहरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वडिलांच्या डोळ्यादेखत मुलाला कारमध्ये उचलून घेऊन गेल्याची घटना घडल्याने पोलिसांचा शहरात वचक कमी झालाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काळ्या कारमधून मुलाला उचललं
ही घटना मंगळवारी रात्री 8.40 वाजता सिडको एन-4 भागातील सेंट्रल मॉलसमोर घडली. चैतन्य सुनील तुपे (वय 7) असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे. सुनील तुपे हे शहरातील एक मोठे बिल्डर आहेत. मंगळवारी रात्री जेवणानंतर वडील आणि मुलगा फिरायला बाहेर पडले होते. वडील पुढे चालत होते आणि चैतन्य सायकलवर मागे येत होता. अचानक काळ्या रंगाची कार आली आणि क्षणार्धात मुलाला कारमध्ये उचलून पळवण्यात आलं. ही संपूर्ण घटना वडिलांसमोर घडली, पण तोपर्यंत अपहरणकर्ते निसटले होते. (CCTV Footage)
2 कोटींच्या खंडणीतून अपहरण
ही घटना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरातील सर्व CCTV फुटेज ताब्यात घेतली. प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या नामांकित उद्याेजकाला अपहरणकर्त्यांकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर मुलाचे अपहरण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
क्रुरतेचा कळस! जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची काढली धिंड
मेळघाटात जादूटोण्याच्या (black magic) संशयावरून आदिवासी महिलेची धिंड आणि अन्य अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. रेट्याखेडा गावात जादूटोण्याच्या (black magic) संशयावरून एका 77 वर्षीय आदिवासी महिलेची धिंड आणि अन्य अघोरी (black magic) प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संतापजनक घटना 30 डिसेंबरची असून तब्बल 18 दिवसांनी म्हणजेच काल 17 तारखेला समोर आली आहे. (Crime News)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
