PM Modi Ajit Pawar : अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींनी मागच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला
PM Modi in Shirdi : आपल्या भाषणात योजनांसाठी किती निधींची तरतूद केली हे सांगत असताना त्यांनी भाजपेत्तर सरकारच्या काळात किती भ्रष्टाचार झाला यावर भाष्य केले. यावेळी मंचावर अजित पवार हे देखील होते.
शिर्डी : शिर्डी दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Shirdi Visit) यांनी आपल्या भाषणात थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला. आपल्या भाषणात योजनांसाठी किती निधींची तरतूद केली हे सांगत असताना त्यांनी भाजपेत्तर सरकारच्या काळात किती भ्रष्टाचार झाला यावर भाष्य केले. अजित पवारांवर (Ajit Pawar) भाजपकडून सातत्याने सिंचन घोटाळा, सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मागील सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप केले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगरच्या शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी शिर्डीजवळील काकडी गावात सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आमचे सरकार 'सबका साथ सबका विकास'च्या मंत्रावर चालते. गरिबांचे कल्याण करण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे. आतापर्यंत 1 कोटी 10 लाख नागरिकांनी आयुष्यमान कार्ड अंतर्गत मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे. गरिबांना मोफत रेशन आणि घर देण्यासाठी 4 लाख कोटी रुपयांचा खर्च केला आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सुतार आणि इतर व्यावसायिकांना मदत करण्यात आली. मी लाखो कोट्यवधी रुपयांचे आकडे सांगत आहे. हेच आकडे आपण ऐकले असतील पण ते भ्रष्टाचाराचे होते. आधीच्या सरकारने एवढ्या रक्कमांचे घोटाळे केले. त्यांनी फक्त घोटाळे केले आहे. पण आम्ही विकास करतोय, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.
काही महिन्यापूर्वी मध्य प्रदेशात झालेल्या भाजपच्या सभेत पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. त्यांचा रोख हा शरद पवार आणि अजित पवारांवर होता. मात्र, पंतप्रधानांच्या या भाषणानंतर काही दिवसांतच अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.
शरद पवारांवर हल्लाबोल....
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर अजित पवार त्यांच्यासमोरच टीका केल्याचे दिसून आले. मोदी म्हणाले की, 'महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री कृषी मंत्री म्हणून काम करत होते व्यक्तिगतरीत्या मी त्यांचा सन्मान करतो मात्र सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपी वर धान्य खरेदी केले परंतु आपल्या सरकारने सात वर्षात साडेतीन लाख कोटी रुपया ंच्या एमएसपीवर धान्य खरेदी केल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.