एक्स्प्लोर

Ajit Pawar : 'सबका साथ, सबका विकास म्हणजे साईबाबांची प्रेरणा', उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने 

Ajit Pawar : 'साईबाबांच्या सबका मलिक एकच्या धर्तीवर पीएम मोदींनी सबका साथ सबका विकासचा नारा दिला.

अहमदनगर : साईबाबांनी येथील जनतेला सुख दुःखावर मात करण्याची शक्ती दिली. त्याचबरोबर सबका मलिक एक असं सांगत येथील जनतेला जगण्याचा मूलमंत्र दिला. तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सबका साथ सबका विकास या घोषणेच्या माध्यमातून मागील दहा वर्षात देशाला बळकट करण्याचे काम केले आहे. आजही याच घोषणेच्या माध्यमातून देशात विकास होत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. शिर्डीच्या साईमंदिरात लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. जसा साईबाबा भक्तांना दिशा दाखविण्याचे काम करतो, येथील मंदिरात आल्यानंतर भाविकांना नवीन ऊर्जा मिळते. तशीच ऊर्जा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातुन देशाच्या नागरिकांमध्ये होत आहे. साईबाबानी 'सबका मलिक एक' असा संदेश दिला. याच संदेशांच्या पावलावर पाऊल ठेवत पीएम मोदी यांनी देशाला सबका साथ सबका विकासाचा नारा दिला. या नाऱ्यातून मागील दहा वर्षात देशात विकासाची गंगा वाहिली आहे. याच घोषणेच्या मार्गाने देशाचा विकास होत असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले. 

अजित पवार पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे विकासाचे समीकरण असून म्हणून आम्ही नेतृत्वाखाली काम करत आहोत. कोणतेही संकट असो, छातीचा कोट करून पीएम मोदी संकटावर मात करत असतात. त्यांच्या वेगवगेळ्या संकल्पनांमुळे राष्ट्र बळकट होत आहेत. आणि त्यादृष्टीने मोदी काम करत आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे मोदी यांच्या नेतृत्वाखाली सगळ्याचा भलं करण्याचं काम सुरु असून आम्ही सर्व जाती धर्माच लोकांचं भलं करण्याचं काम करतो आहोत. पुढं देखील महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू, असंही अजित पवार म्हणाले. 

 साई मंदिरातून भाविकांना आंतरिक ऊर्जा

शिर्डीच्या साई मंदिरातुन भाविकांना आंतरिक ऊर्जा मिळत असते. पीएम नरेंद्र मोदींच्या दौऱ्यातून लोककल्याणाच्या कार्य होत आहे. साईमंदिर परिसरात वेगवगेळे प्रकल्प सुरु करण्यात आले असून यामुळे भाविकांना चांगली सोया उपलब्ध होणार आहे. तसेच आजच्या अनेक वर्षांपासून रखडलेला निळवंडे धरणाचा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. आज पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डाव्या कालव्याचे उदघाटन करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे पावणेदोन लाख क्षेत्र हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून मात्र शेतकऱ्यांनी पाणी बचतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. जेणेकरून आगामी काळात आपल्या बांधवाना या धरणाचा चांगला उपयोग होऊ शकतो असेही अजित पवार म्हणाले. 

इतर महत्वाची बातमी : 

PM Narendra Modi Shirdi Visit Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यात काय काय करणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karad North Assembly Election 2024 : बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 3 PM : 14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAaditya Thackeray Speech Dapoli | राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम महायुतीने केलं-आदित्य ठाकरेTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAaditya Thackeray Bag Checking : उद्धव ठाकरेनंतर आदित्य ठाकरे यांच्याही बॅगांची तपासणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karad North Assembly Election 2024 : बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
Mallikarjun Kharge : नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही; बटेंगे तो कटेंगे वक्तव्यावरुन पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण
मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही; बटेंगे तो कटेंगे वक्तव्यावरुन पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण
Kolhapur Uttar Vidhan Sabha :  बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
Embed widget