NO Mask NO Darshan : आजपासून शिर्डीत 'नो मास्क नो दर्शन'; पालकमंत्र्यांच्या मंदिर प्रशासनाला सूचना
Sai Mandir : साईबाबा संस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ भक्तांना मास्क देऊनच दर्शनासाठी प्रवेश द्यावा. ज्यांच्याकडे मास्क नसेल. त्यांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
Shirdi Sai Mandir : देशात कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. देशासह राज्यात कोरोनाच्या नव्या विषाणूचे (JN.1) रुग्ण वाढत असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या (Shirdi Saibaba Mandir) दर्शन रांगेच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना मास्क (Mask) देण्याच्या सुविधा उपलब्ध करूनच दर्शनासाठी प्रवेश द्यावा. ज्या भाविकांकडे मास्क नसेल. त्यांना दर्शनासाठी प्रवेश देऊ नये, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी साई संस्थान प्रशासनाला दिल्या आहेत.
साईबाबांचे भक्त संपूर्ण जगभरात असल्याने शिर्डीत साई समाधी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून भाविक शिर्डीला सातत्याने येतात. मात्र आता कोरोनाच्या जेएन.1 (JN.1) या नव्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.
बुधवारपासून मास्कसक्ती (Mask Compulsory)
त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि ग्रामस्थांना प्रवेशद्वाराजवळच मास्क देण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांना दिली आहे. या सूचनेची अंमलबजावणी बुधवारपासूनच केली जाणार असल्याने आता दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना तसेच ग्रामस्थांनादेखील मास्क वापरणे बंधनकारक आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांकडून प्रशासनाला सूचना (Instructions to Administration from Union Minister of State for Health)
जेएन १ या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचा केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र व गोवा या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. या राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली आहे. सध्या सुटीचे दिवस असल्याने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे खबरदारीच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.केरळमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने तिथे जास्त प्रादुर्भाव वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. २२ जानेवारी २०२३ ला अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होणार असल्याने लाखो भाविकांची गर्दी तिथे होणार आहे. आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसह ज्या व्यक्तींना आजार असतील अशांनी विशेष काळजी घ्यावी, गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केले आहे.
आणखी वाचा
Covid Vaccine : JN.1 सबव्हेरियंटवर कोरोना लस किती प्रभावी? तज्ज्ञांचं मत काय?