Mumbai Crime: अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
या मारहाणीची चित्रफित सध्या व्हायरल झाली आहे. आरोपी रिक्षाचालकावर (पोक्सो) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
Mumbai Crime: राज्यात गुन्हेगारी, अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढलं असून राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडलाय. दरम्यान अल्पवयीन मुलीला रिक्षावाला अश्लील इशारा करत असल्याचं लक्षात येताच नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न अवस्थेत त्याची धिंड काढत काशिमिरा पोलिस ठाण्यात नेल्याची घटना घडली आहे. मीरा रोड परिसरात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेची चित्रफित व्हायरल झाली असून काशिमिरी पोलिसांनी रिक्षाचालक राजू वर्मा याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 75 (2) तसेच बालकांचे लैंगिक अत्यारापासून संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. आम्ही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे. (Crime News)
नक्की झाले काय?
अल्पवयीन मुलीची छेड काढणार्या एका रिक्षावाल्याला नागरिकांनी चोप देऊन धिंड काढली. रविवारी संध्याकाळी मिरा रोडच्या काशिमिरा परिसरात ही घटना घडली. पीडित मुलगी 12 वर्षांची असून मिरा रोड परिसरात राहते. राजू वर्मा (38) नावाचा रिक्षाचालक तिला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता. रविवार 5 जानेवरी रोजी संध्याकाळी ही मुलगी कामानिमित्ताने घराबाहेर गेली होती. त्यावेळी राजूने अश्लील इशारे करत तिला सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी खुणावले. मुलीने लगेचच तेथून पळ काढला आणि घरी येऊन हा प्रकार सांगितला. या भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते अजय साळवी यांनी रिक्षावाल्याला रंगेहाथ पकडण्यासाठी पीडित मुलीला पुन्हा त्याच रस्त्याने जाण्यास सांगितले आणि सापळा लावला. मुलीला परत आलेलं पाहून रिक्षाचालकाने पुन्हा अश्लील इशारा केला. ते पाहून उपस्थित नागरिकांना त्याला रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला आणि अर्धनग्न धिंड काढत काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले. या मारहाणीची चित्रफित सध्या व्हायरल झाली आहे. आरोपी रिक्षाचालक राजू वर्मा याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५ (२) तसेच बालकांचे लैंगिक अत्यारापासून संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
प्रेमप्रकरणातून भावानेच बहिणीला संपवलं
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे. 17 वर्षीय मुलीचा 200 फूट डोंगवरुन खाली ढकलून खून करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानेच तिला ढकलून देऊन संपवलं आहे. नम्रता गणेश शेरकर वय 17.2 वर्ष असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. तर ऋषिकेश तानाजी शेरकर वय 25 वर्ष असे ढकलून दिलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
हेही वाचा:
धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये भावानेच संपवलं बहिणीला, 200 फूट उंच डोंगरावरुन दिलं ढकलून