Rani Lanke : सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत ठाण मांडून राहणार, राणी लंकेंचा इशारा, पिठलं-भाकरी करत केला सरकारचा निषेध
Rani Lanke, Ahmednagar : दुध,कांद्यासह विविध प्रश्नाबाबत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात केली आहे.
Rani Lanke, Ahmednagar : दुध,कांद्यासह विविध प्रश्नाबाबत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात केली आहे. दरम्यान, निलेश लंके आंदोलन करत असताना त्यांच्या पत्नी राणे लंकेही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. राणे लंके यांनी आंदोलनस्थळी स्वंयपाक करत आणि चूल पेटवत सरकारचा निषेध केला आहे. शिवाय सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत ठाण मांडून राहणार, असा इशाराही राणे लंके यांनी दिलाय.
राणे लंके काय म्हणाल्या?
जनआक्रोश आंदोलन कालपासून सुरु आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, दुधाला भाव मिळावा. यासाठी लंके साहेबांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. आम्ही सर्व भगिनी मिळून पिठलं भाकरी करुन आंदोलन करत आंदोलन करत आहोत. सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत ठाण मांडून राहणार आहोत, असा इशाराही राणी लंके यांनी दिला आहे.
निलेश लंके काय म्हणाले?
आपल्या कांद्याल, दुधाला, शेतमालाला वाजवी भाव व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळण्यासाठी मी जनतेचा एक सेवक हया नात्याने आंदोलन करत आहे. जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या अडमुठ्या भूमिकेमुळे आज सकाळपासून सुरू असणाऱ्या आंदोलनाकडे दुग्धविकास मंत्री व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे मी आज रात्री आपल्या सहकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच मुक्काम करणार आहे. जोपर्यंत सर्व प्रश्नांची सोडवणूक होत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यासाठी ठाम आहे, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना दिशाहीन करण्याचा विडा उचलणाऱ्या या सरकारच्या विरोधात नगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी व दूध उत्पादक बांधव, महाविकास आघाडीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सक्रिय सहभाग या आंदोलनात आहे, असंही लंके यांनी म्हटलं आहे.
शेतकरी जनआक्रोश आंदोलन
— Nilesh Lanke - निलेश लंके (@INilesh_Lanke) July 6, 2024
दिवस दुसरा - जिल्हाधिकारी कार्यालय, अ.नगर#दूध #कांदा pic.twitter.com/xMUB37IJ9x
शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधाकडे विद्यमान राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. दुधाला योग्य दर देण्याबाबत हे राज्य सरकार गंभीर नाही,तसेच माझ्या नगर जिल्ह्यात कांदा हे पीक मुख्यतः पिकवले जाते,कांद्याच्या हंगामात तर दर मिळालाच नाही आजही तीच परिस्थिती कायम आहे. pic.twitter.com/TIZnseoSZq
— Nilesh Lanke - निलेश लंके (@INilesh_Lanke) July 5, 2024
इतर महत्वाच्या बातम्या