(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar News : जिद्द असावी तर अशी! उंची अवघी अडीच फूट, ना घर ना दार, आलोकला कलेतून कुटुंबांचा आधार व्हायचंय!
Ahmednagar News : अकोले (Akole) तालुक्यातील धामणगावाजवळ भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या आलोकला जन्मापासून दिव्यंगत्व आलं, मात्र
Ahmednagar News : 'वय वर्ष 16 मात्र, शारीरिक वाढ अवघी सव्वा दोन ते अडीच फूट.. मात्र याही परिस्थितीत आपल्या कुटुंबाला साथ देण्याची व कुटुंब सांभाळण्याची जिद्द व तयारी असणाऱ्या अलोकची ही अनोखी कहानी'. अकोले (Akole) तालुक्यातील धामणगावाजवळ भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या आलोकला जन्मापासून दिव्यांगत्व आलं, मात्र याही परिस्थितीत आलोकच्या कलेने त्याला जिवंत ठेवल आहे. कलेच्या भरोशावर अलोक स्वप्न पाहत असून कलेतून कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न तो करत आहे.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील धामणगाव (Dhamangaon) आवारी हे गाव. धुमाळवाडी आणि धामणगाव आवारी याच्याशिवेवर वर असणारी एक छोटीशी वस्ती. याच गावात आलोक शेलार (Alok Shelar) हा आपल्या आजी-आजोबांसह वास्तव्य करत आहे. अडीच वर्षाचा असतानाच आई-वडील आश्रमात ठेवत होते. मात्र आजी आजोबांनी निर्णय घेतला आणि गेल्या बारा वर्षापासून ते आलोकचा सांभाळ करत आहेत. अलोक सोळा वर्षाचा असला तरी त्याची शारीरिक वाढ मात्र जन्मापासूनच झाली नाही. आज अवघ्या सव्वा दोन ते अडीच फूट शारीरिक वाढ झालेला आलोक हा जीवनाशी संघर्ष करतो आहे. जन्मापासून दिव्यांग असला तरी चित्रकला आणि गायन (Singing) याची मोठी आवड आलोकला निर्माण झाली. यातूनच आलोक आता कुटुंबाला सांभाळण्याची स्वप्न पाहत आहे. दोन वर्षांपूर्वी आलोक आजारी असताना हॉस्पिटलमध्ये दाखल झालानंतर त्या ठिकाणीच त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली.
चित्रकलेत विशेष प्राविण्य असलेल्या लोकांना आपली कला कोणालाही दाखवली नाही. मात्र कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील कोळपेवाडी येथील कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून त्याला ऑनलाईन शिक्षण दिलं आणि आज आलोकने साकारलेली चित्रे अनेकांचे मन वेधून घेत आहेत. आपल्यात असलेले अपंगत्व विसरून गेल्या दोन वर्षांपासून कला आणि गायन या क्षेत्रात पुढे येण्याचा प्रयत्न अलोक करत आहे. भविष्यात आपल्या कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी मला घ्यायची आहे, असंच त्यांन बोलून दाखवलंय. मात्र या दिव्यांगावर मात करण्यासाठी त्याला गरज आहे, ती शासकीय मदतीची, ती पूर्ण होणे गरजेचे असल्याचे अपेक्षा आहे.
अपंग मंत्रालयाकडून अपेक्षा
गेल्या बारा वर्षापासून आई-वडील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मोलमजुरी करत असल्याने अलोकचे आजी, आजोबा त्याचा सांभाळ करत आहेत. घरकुलासाठी दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठवला, मात्र आजही घर नाही. आलोकचा मेडिकल खर्च सुद्धा बिगारी करून आजी आजोबा पूर्ण करतात. हे सांगताना आलोकच्या आजोबांना आपले अश्रू अनावर झाले. वर्षभरापूर्वी नव्यानं स्थापन झालेलं अपंग मंत्रालय हे अपंगांना मदत देईल, साथ देईल हीच अपेक्षा आहे. मात्र आलोक सारखे आज अनेक जण या मदतीपासून वंचित आहे. अलोकला घर आणि घरकुल मिळावं हीच अपेक्षा आहे. त्यासाठी राज्य सरकार निर्णय घेणार का हेच पाहणं महत्त्वाचं आहे..