एक्स्प्लोर

Ashutosh Kale : 'परदेशात असताना दादांचा फोन आला, आल्यावर भेट घे', एवढच म्हणाले! आमदार आशुतोष काळे अजित दादांसोबत!

Ashutosh Kale : परदेशात गेलेले कोपरगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारतात येताच अजित दादांच्या बरोबर उभे राहिले आहेत.

Ashutosh Kale : 'परदेशात असताना अजित पवारांचा (Ajit Pawar) फोन आला होता. कुठे आहे? विचारलं मी त्यांना सांगितल्यावर आल्यावर माझी भेट घे एवढेच त्यांनी सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांनी सोशल मिडियावर राज्यातील घडामोडी समजल्या. परदेशात जाण्यापूर्वी असं काही घडेल याची कल्पना सुद्धा नव्हती, अशी  प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी आहे. सोबत अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, यावर अनेकांचा विश्वास अद्यापही बसलेला नाही. यात कोपरगाव राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी कुटुंबासह परदेशात गेलेले कोपरगाव (Kopargaon) मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारतात येताच अजित पवारांच्या बरोबर उभे राहिले आहेत. खरं तर परदेश प्रवासात असताना विरोधी पक्ष ते सत्ताधारी पक्ष असा राजकीय प्रवास आशुतोष काळे यांचा झाला आहे. मात्र तत्पूर्वी त्यांना याबाबत काहीच कल्पना नसल्याची प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलतांना दिली आहे. 

आशुतोष काळे यावेळी म्हणाले की, परदेशात असताना अजित दादांचा फोन आला होता. कुठे आहे? विचारलं, मी त्यांना प्रदेशात असल्याचे सांगितल्यावर आल्यावर माझी भेट घे, एवढेच त्यांनी सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांनी सोशल मीडियावर राज्यातील घडामोडी (maharashtra NCP crisis) समजल्या. त्यावेळी मनात आलं, असं कसं घडलं, दोन पक्ष सत्तेत असताना आपला तिसरा पक्ष त्यात कसा जाईल. मात्र काहीतरी विचार करूनच निर्णय झाला असेल असं मला वाटलं. दरम्यान परदेशातून आल्यानंतर अजितदादांना भेटलो. मतदार संघातील विकास काम मार्गी लागतील, असा आश्वासन दादांनी या यावेळी दिले. महाविकास आघाडीच्या काळातही दादांनी मला मदत केली होती. एवढं बोललो आणि त्या ठिकाणाहून अजित दादांना पाठिंबा देऊन मतदारसंघात आलो. 

साहेबांचा आशीर्वाद आमच्यावर कायम ... 

काळे पुढे म्हणाले की, काळे आणि पवार कुटुंबीयांचे तीन पिढ्यांचे संबंध माझे आजोबा शरद पवार मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून होते. पवार कुटुंब आज एकत्र आहे, वैचारिकदृष्ट्या दोन वेगळ्या भूमिका मात्र भविष्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा एक परिवार म्हणूनच समोर येईल, याची मला खात्री वाटते. पवार साहेबांना मानणारे आम्ही कार्यकर्ते असून वैचारिक दृष्ट्या सुद्धा एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच अजित दादा बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर शरद पवार साहेबांना सुद्धा भेटलो. साहेबांचा आशीर्वाद आमच्यावर कायम आहे. रयत शिक्षण संस्थेवर तुम्ही काम करत आहात, मात्र या संस्थेत आपण राजकारण करत नाही, याची काळजी घ्या, असा सल्लाही यावेळी शरद पवार यांनी दिला.  

हे ही वाचा :

सरकार बदललं मात्र आमदार अजून मीच, नादाला लागाल तर ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget