(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग उद्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती
Ahmednagar News : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे उद्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
अहमदनगर : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे उद्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Vithhalrao Vikhe Patil) यांच्या 123 व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य व कलागौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्या राजनाथ सिंह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित राहणार आहेत.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन दरवर्षी साहित्य व कलागौरव (Sahitya Kalgaurav Award) पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यंदा प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात गुरुवार ऑगस्ट रोजी दु. 1 वा. हा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यातील डॉ. निशिकांत ठकार यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. शैलजा बापट यांना यंदाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विशेष साहित्य पुरस्कार विश्वास वसेकर यांच्या कविता संग्रहास दिला जाणार आहे.
दरम्यान उद्या दुपारी 12 वाजता साईबाबांच्या समाधीचे (Shirdi Saibaba) दर्शन घेतल्यानंतर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे गाडगीळ सभागृहासमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल असून या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दुष्काळाबाबत राज्याच्या कॅबिनेटमध्ये (cabinet) चर्चा झाली आहे. श्रावण संपेपर्यंत पाऊस येईल, अशी अजूनही आम्हाला आशा आहे. मात्र समाधानकारक पाऊस झाला नाही तर केंद्राकडून निश्चितच दुष्काळ पॅकेजची आम्हाला अपेक्षा आहे, असं मत सुजय विखे यांनी बोलून दाखवल आहे.
मंत्री राजनाथ सिंह प्रथमच जिल्ह्यात...
या पार्श्वभूमीवर सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यंदा प्रथमच पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. तसेच 97 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पद्मश्री डॉ. विखे पा. यांचा जयंती दिन 'शेतकरी दिन' म्हणून राज्यात साजरा केला जात असल्याने यंदा पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती महत्वपूर्ण ठरणार असल्याचे खा. डॉ. विखे पा. म्हणाले. प्रवरानगर येथे सोहळ्याची जय्यत तयारी प्रवरा परिवाराने केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रथमच जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या स्वागताचे नियोजन केले आहे.
पुरस्काराचे मानकरी
यंदाचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार कलेच्या सेवेबद्दल वसंत अवसरीकर, समाज प्रबोधन पुरस्कार समाज प्रबोधन पत्रिका ( अशोक चौसाळकर) यांना तर नाट्यसेवेबद्दल पुरस्कार जळगाव येथील शंभू पाटील यांना देण्यात येणार आहे. डॉ. विखे पा. अ.नगर जिल्हा साहित्य पुरस्कार श्रीरामपूर येथील डॉ. शिरीष लांडगे यांच्या ज्ञानेश्वर दर्शन या ग्रंथास तर अनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार विकास पवार यांच्या भंडारदरा धरण शतकपुर्ती प्रवास या पुस्तकास देण्यात येणार आहे. प्रवरा परिसर साहित्य पुरस्कार कोल्हार येथील डॉ. अशोक शिंदे यांच्या कविता संग्रहास देण्यात येणार असल्याचे खा. डॉ. विखे पा. म्हणाले.
इतर महत्वाची बातमी :