एक्स्प्लोर

Most Popular CM Of India Survey: योगी आदित्यनाथ, ममता बॅनर्जी, एकनाथ शिंदे की, अरविंद केजरीवाल; देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?

Popular CM Of India: इंडिया मूड ऑफ द नेशननं ऑगस्ट 2023 मध्ये देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत एक सर्वेक्षण केलं आहे. यावेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये टॉप-5 च्या यादीत कोणाचा समावेश आहे?

Most Popular CM Of India Survey: 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) जागांच्या संदर्भात इंडिया टुडे-सीव्होटर मूड ऑफ द नेशनचं सर्वेक्षण प्रसिद्ध झालं आहे. ज्यामध्ये देशातील सर्व राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेण्यात आला. या सर्वेक्षणात लोकसभेतील जागांच्या मुल्यांकनासह भारताच्या 30 मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्यास सांगितलं होतं. ज्यामध्ये एकूण 134,487 लोकांनी सहभाग घेतला आणि त्यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री निवडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) हे सध्या भारताचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून स्पष्ट झालं आहे. 

15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलेलं की, त्यांच्या मते देशाचा सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण? याला प्रत्युत्तर म्हणून जास्तीत जास्त 43 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना भारताचे नंबर 1 मुख्यमंत्री म्हटलं आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना दुसरं स्थान मिळालं आहे. या महिन्यात जाहीर झालेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं की, 19 टक्के लोक केजरीवाल यांना लोकप्रिय मुख्यमंत्री मानतात. मात्र, याच प्रश्नावर जानेवारी 2023 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता 4 टक्क्यांनी वाढली, तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तीन टक्के कमी मतं मिळाली आहे. या यादीत इतर कोणत्या मुख्यमंत्र्यांची नावं आहेत, ते जाणून घेऊयात सविस्तर... 

हेही आहेत लोकप्रिय मुख्यमंत्री 

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना एकूण 8.8 टक्के मतं मिळाली आहे. तर, चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Tamil Nadu CM MK Stalin) आहेत, त्यांना लोकांनी केवळ 5.6 टक्के मतं दिली आहेत. त्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Odisha CM Naveen Patnaik) हे 3 टक्के मतांसह पाचव्या क्रमांकासह सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत सहभागी झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मात्र या यादीतील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश झालेला नाही. 

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ : 43 टक्के
अरविंद केजरीवाल : 19 टक्के
ममता बनर्जी : 8.8 टक्के
एमके स्टालिन : 5.6 टक्के
नवीन पटनायक : 3 टक्के

कोणाची लोकप्रियता वाढली अन् कोणाची कमी झाली? 

या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या इंडिया टुडे मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या सर्वेक्षणापेक्षा यावेळी अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता तीन टक्क्यांनी वाढली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जानेवारी 2023 मध्ये 16 टक्के मतं मिळाली होती. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांची लोकप्रियताही वाढली आहे. या वर्षी जानेवारीत त्यांना 7.3 टक्के मतं मिळाली होती, तर सध्या 8.8 टक्के मतांसह ते तिसरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत.

एमके स्टॅलिन हे देशातील 30 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना या वर्षी जानेवारीच्या सर्वेक्षणात 4.6 टक्के मतं मिळाली, जी सध्याच्या आकडेवारीपेक्षा एक टक्क्यानं कमी होती. सर्वेक्षणानुसार नवीन पटनायक या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहेत. गेल्या जानेवारीत झालेल्या सर्वेक्षणात त्यांना 3.4 टक्के मतं मिळाली होती. त्यानुसार ताज्या सर्वेक्षणात त्यांची लोकप्रियता 0.4 नं कमी झाली आहे.

 महत्त्वाच्या इतर बातम्या : 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत केजरीवालांच्या AAP च्या झाडूची जादू चालणार? पोल ऑफ पोल्सचे निकाल काय सांगतात?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरीMahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाहीDevendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Embed widget