Shirdi: खासदार सुजय विखे पाटील आणि गौरव मोरे यांचा 'वन-टू- का फोर' गाण्यावर जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ
भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) आणि अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) यांनी शिर्डी (Shirdi) येथील कार्यक्रमामध्ये 'वन-टू- का फोर' या गाण्यावर डान्स केला.
Shirdi: शिर्डीत (Shirdi) नुकत्याच पार पडलेल्या महापशुधन एक्स्पोच्या निमित्ताने शेतकरी बांधवांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काही नेत्यांनी तसेच कलाकारांनी देखील हजेरी लावली. गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosale) यांनी या कार्यक्रमात काही गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) आणि अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) हे स्टेजवर उपस्थित होते. सुजय विखे पाटील आणि गौरव मोरे यांनी या कार्यक्रमात 'वन-टू- का फोर' या गाण्यावर डान्स केला.
शिर्डीत (Shirdi) पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी हास्यकलाकार गौरव मोरे आणि गायक सुदेश भोसले यांच्यासोबत वन-टू- का फोर आणि मैं हूँ डॉन गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय. सुजय विखे यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरताच उपस्थितांनी जल्लोष करत त्यांना दाद दिली.
पाहा व्हिडीओ:
गौरव मोरेनं शेअर केली पोस्ट
गौरव मोरेने सोशल मीडियावर शिर्डीतील कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये गौरव आणि सुदेश भोसले हे डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला गौरवनं कॅप्शन दिलं, शिर्डी महोत्सव 2023 ज्यांना बघुन आपण मोठे झालो. आपल जेवढं वय आहे तेवढा अनुभव असलेले सुधेश सर यांच्यासोबत मंच शेयर करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो.'
View this post on Instagram
अभिनेता गौरव मोरे हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेच्या माध्यमातून गौरवने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तो विविध कार्यक्रमांमध्ये देखील हजेरी लावतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे गौरवला विशेष लोकप्रियता मिळाली.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील गौरव मोरे याच्यासोबतच समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे,प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: