आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस! 'आता पुढचं आंदोलन कसं तर, जरांगे पाटील सांगतील तसं', आज मनोज जरांगे अहमदनगरमध्ये!
Manoj Jarange : 'आजचा दिवस चांगला असून आज मराठा बांधवांच्या पदरात आरक्षणाचं दान टाकावं' अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
अहमदनगर : आज मनोज जरांगे (Manoj Jarange) अहमदनगर (Ahmednagar) दौऱ्यावर आहे. जरांगे यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) च्या मागणीसाठी सरकारला (Maharashtra Government) दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. 'राज्याचे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) दिलेला शब्द पाळणारे असून ही प्रतिमा महाराष्ट्रातल्या घराघरात आहे. त्यामुळे आजच्या चांगल्या दिवशी मराठा आरक्षणाचा निर्णय ते घेतील अशी अपेक्षा आहे. पदाला किंमत देण्यापेक्षा गोरगरीब मराठा समाजाला न्याय द्यावा, शब्दाला जागणारे तुम्ही आहात, मात्र आजच्या दिवसांनंतर एक तास सुद्धा मिळणार नाही, उद्यापासून हा विषय संपला', असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आज जरांगे हे अहमदनगरमध्ये (Ahmednagar) येणार असून असून आजच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
'मराठा बांधवांच्या पदरात आरक्षणाचं दान टाका'
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांना राज्य सरकारने दिलेला चाळीस दिवसांचा वेळ आज संपणार आहे. शेवटचे काही तास शिल्लक असून दरम्यानच्या काळात सरकारकडून जरांगे यांच्याशी कोणताही संपर्क सरकारने केलेला नाही. त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्वाचा असून आज सकाळी मनोज जरांगे पाटील हे अहमदनगरला रवाना झाले. या ठिकाणी ते धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवाना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. तत्पूर्वी एबीपी माझाशी बोलताना सरकारला पुन्हा एकदा सूचित केले आहे. आजचा दिवस चांगला असून आज मराठा बांधवांच्या पदरात आरक्षणाचं दान टाकावं अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. आजच्या दिवसांनंतर सरकारला वेळ मिळणार नाही, तो विषय संपला असा इशारा देखील देण्यात आला आहे.
जरांगेंचा धनगर आरक्षणाला पाठिंबा
अहमदनगरच्या (Ahmednagar) चौंडी येथे दसऱ्याच्या दिवशी यशवंत सेनेकडून धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) देखील उपस्थित राहणार असून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा देणार आहेत आणि एकमेकांचे लहान मोठे भाऊ आहोत आणि एकमेकांच्या मदतीला गेलंच पाहिजे, असं सांगत चौंडी येथील यशवंत सेनेच्या धनगर आरक्षण मेळाव्याला आपण जात असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी अनेक कार्यक्रम असून धनगर बांधवांचा आशीर्वाद घेतल्यानंतर पुढे जाणार असल्याचे देखील ते म्हणाले.
गिरीश महाजन यांचा फोन झाला...
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले की, काल रात्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा फोन येऊन गेला. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझं बोलणं झालं नाही. आज 24 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत तुम्हाला काय करता येईल ते करा, त्याच्यानंतर फोन नाही, कारण आमच्या दारात आरक्षण घेऊन यायचं. परंतु त्यांचं काय विषय होता, पंधरा दिवसांपासून फोनच माझ्याकडे नव्हता, त्यामुळे माहिती नाही त्यांनी सांगितले. आरक्षण देणार असेल तर बोलू नाहीतर नाही, कारण त्यांचा वेळ आज संपतो आहे. आजचा दिवस आणि रात्र, नंतर त्यांचं काही एक ऐकून घेतलं जाणार नाही, एक तास सुद्धा आता दिला जाणार नाही, तो विषय उद्यापासून संपला, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
इतर महत्वाची बातमी :
Parbhani : मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचं सत्र सुरूच, परभणीत आणखी एका तरूणाची आत्महत्या