एक्स्प्लोर

Maratha Reservation : लातूर: मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक, कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा ताफा अडवला

Maratha Reservation Latur : मंत्री संजय बनसोडे हे आज गावातून एका कार्यक्रमासाठी चिमाची वाडीकडे निघाले असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला.

लातूर :  मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळेपर्यंत लोकप्रतिनिधींना गाव बंदी करण्याचा निर्णय राज्यातील अनेक गावांनी घेतला आहे. असाच निर्णय लातूर जिल्ह्यातील (Latur News) वाढवणा या गावाने घेतला आहे. वाढवणा हे आहे गाव उदगीर विधानसभा मतदारसंघ मधील आहे. या मतदारसंघाचे आमदार हे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) हे आहेत. मंत्री संजय बनसोडे हे आज गावातून एका कार्यक्रमासाठी चिमाची वाडीकडे निघाले असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलकांनी हा ताफा अडवला. यावेळी मराठा आरक्षणासाठी साठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी आपल्या भावना तीव्र शब्दात कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्यासमोर मांडल्या आहेत.
 
चिमाची वाडी येथील एका कार्यक्रमासाठी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे हे आज आले होते. ते वाढवण येथील पाटीवर आल्यानंतर  यावेळी आंदोलकांनी हातामध्ये भगवे झेंडे घेत कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या ताफा अडवला. यावेळी पोलिसांनी संरक्षण कवच तयार करत संजय बनसोडे यांच्या कारला संरक्षण दिले. मात्र, आंदोलकांची घोषणाबाजी सुरू असताना संजय बनसोडे हे स्वत: गाडीच्या खाली उतरले आणि आंदोलकांशी चर्चा केली.

आमचा आवाज बना आम्ही तुमच्या पाठीशी....

मुख्यमंत्र्यासमोर आमचे लोकप्रतिनिधी म्हणून मराठा आरक्षणसाठी संघर्ष करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली होती. या मागणीला उत्तर देताना संजय बनसोडे यांनी सागितले की, मी मंत्री नसतो आणि आरक्षण कमिटीमध्ये नसतो तर भगवी टोपी घालून मी ही तुमच्या बरोबर राहिलो असतो. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आरक्षण कमिटी हे 100 टक्के आरक्षण देण्याच्या बाजूने काम करत आहेत. मीदेखील तुमच्याच बाजूने आहे, असे सांगत आंदोलकांशी चर्चा केली.
        

संजू भाऊ तुम्हाला मतदान करतो, आज सहकार्य करा...

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हे आंदोलन सुरू असून या आंदोलनात तुम्ही आम्हाला सहकार्य करा अशी विनंती मराठा आरक्षण आंदोलकांनी केली. निवडणुकीत आमचं मत तुम्हालाच आहे. मात्र, या वेळेस वाढवणा गाव असेल किंवा इथला पुढचा आपला दौरा आहे तो रद्द करा अशी मागणी आंदोलकांनी जोर लावत लावून धरली. संजय बनसोडे यांनी ही आंदोलकांशी काही काळ चर्चा केली आणि त्यानंतर ते पुढील नियोजित दौऱ्यासाठी निघून गेले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
परवाना निलंबित, तरीही बेकरी सुरु, प्रशासनाची लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल
परवाना निलंबित, तरीही बेकरी सुरु, प्रशासनाची लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल
NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणी केमिस्ट्री प्राध्यापकाचा शोध सुरू, लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयचा मुक्काम
नीट पेपरफुटी प्रकरणी केमिस्ट्री प्राध्यापकाचा शोध सुरू, लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयचा मुक्काम
NEET Result : तुरुंगात असलेल्या मोटेगावरकरांच्या RCC क्लासचा NEET निकालानंतर जल्लोष, थोड्याच वेळात CBI च्या पथकाकडून चौकशी
तुरुंगात असलेल्या मोटेगावरकरांच्या RCC क्लासचा NEET निकालानंतर जल्लोष, थोड्याच वेळात CBI च्या पथकाकडून चौकशी

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Amitabh Bachchan Shares Health Update: अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; स्वतः बिग बींनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले, 'रिकव्हरीचा काळ खूप कठीण...'
अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; ICU मध्ये केलेलं दाखल, बिग बींना नेमकं झालंय तरी काय?
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
Actress Purva Kaushik Emotional On CJP Protest: 'हेल्पलेस फील होतंय, माणसाची किंमत इतकी कमीय, माहीत नव्हतं'; विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज पाहून मराठी अभिनेत्री हादरली, VIDEO
'हेल्पलेस फील होतंय, माणसाची किंमत इतकी कमीय, माहीत नव्हतं'; विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज पाहून मराठी अभिनेत्री हादरली, VIDEO
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Ajit Pawar and Sunetra Pawar: अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
Embed widget