Morcha on Election Commission: रस्त्यावरची लढाई सुरु; मतदारयादीत घोटाळा, 1 नोव्हेंबरला राज्यात विरोधकांचा निवडणूक आयोगावर विराट मोर्चा!
राज्यातील बोगस मतदारयादीवरून विरोधक आक्रमक झाले असून, संजय राऊत यांनी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चाची घोषणा केली.

Morcha on Election Commission: निवडणूक आयोगाची सलग दोन दिवस भेट घेऊनही निवडणूक आयोगाकडून कोणतीही समाधानकारक भूमिका न घेतल्याने राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (opposition rally election commission) आता दंड थोपटले आहेत. निवडणूक आयोगाविरोधात मुंबईमध्ये सर्वपक्षीय विरोधकांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. आज (19 ऑक्टोबर) शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे सचिन सावंत, माकपचे प्रकाश रेड्डी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी एक नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा आयोगावर काढणार असल्याचे जाहीर केले. या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते करतील, असे राऊत म्हणाले. मोर्चाचा मार्ग सर्वपक्षीय नेते निश्चित करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदारयादीत एक कोटी घुसखोर (Maharashtra election commission protest)
यावेळी संजय राऊत यांनी मोर्चाची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाची आम्ही दोन दिवस भेट घेऊनही कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही. त्यामुळे आयोगाच्या या मॅच फिक्सिंग विरोधात आमचा हा लढा असल्याचं संजय राऊत म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून आम्ही निवडणूक आयोगाविरोधात लढत आहोत. त्यातून काय निष्पन्न होईल माहीत नाही. राज्यातील मतदारयादीत एक कोटी घुसखोर असून ते कमी करण्यासाठी अमित शाहांना आवाहन करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी बोगस मतदारांवरून केलेल्या वक्तव्यांचा सुद्धा दाखला दिला. एक नोव्हेंबरचा दिवस हा महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाचा आणि लोकशाहीसाठी महत्त्वाचा असेल असं त्यांनी सांगितलं. यापूर्वी असाच मोर्चा दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात झाला होता. आता राज्यामध्ये हा मोर्चा निघेल, असं त्यांनी सांगितलं.
आयोग अनेक गोष्टी दडवून ठेवत आहे (Maharashtra voter list controversy)
जयंत पाटील म्हणाले की, निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर दिलेलं नाही. दुबार मतदार काढण्यासाठी काय कार्यक्रम हाती घेणार, पत्ते ज्यांचे नाहीत त्यांचे तुम्ही काय करणार आहात? हा खुलासा आयोगाने करावा. आयोग अनेक गोष्टी दडवून ठेवत आहे. महाराष्ट्त लोकशाहीबद्दल आस्था आहे त्यांनी मोर्चात सहभागी व्हावं, असे आवाहन त्यांनी केले. बाळा नांदगावकर म्हणाले की, मतदार यादीमधील घोळ ही भावना लोकांच्या मनात आहे. स्वतः आमदार सुद्धा ते बोलत आहेत. निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिला होतं. त्यानंतर चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सांगितलं आहे. याचा अर्थ घोळ झाला आहे. आता ते थतूरमातुर उत्तर देत आहेत. मोर्चात आम्ही पक्षाच्या वतीने सामील होऊ, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या

























