एक्स्प्लोर

Raj Thackeray: अगोदरच मॅच फिक्सिंग, सत्ताधाऱ्यांना राग येतो कारण शेण खाल्लंय ते 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत; राज ठाकरेंच्या भाषणातील 12 मोठे मुद्दे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात तब्बल 96 लाख बोगस मतदार भरल्याचा गंभीर आरोप केला. निवडणूक आयोगाने याद्या स्वच्छ करेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली.

Raj Thackeray on Election Commission: राज्यात सध्या होणाऱ्या निवडणुकांसाठी 96 लाख खोटे मतदार (Maharashtra fake voters list) महाराष्ट्राच्या यादीत भरले असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना केला. राज यांनी मुंबईमध्ये 8 ते 10 लाख, ठाण्यामध्ये 8 ते 8.5  लाख, तसेच पुणे आणि नाशिकमध्येही अशाच प्रकारे खोटे मतदार भरले गेल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही आणि सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नयेत. निवडणूक आयोगाने जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही आणि सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली. 

सध्याची लढाई संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी (Maharashtra voter list scam) 

स्थानिक पक्षांना संपवून टाकण्यासाठी अशा मतदार याद्या तयार करून माणसे घुसवायची, हे षडयंत्र सुरू असल्याचे राज म्हणाले. हा मतदारांचा अपमान आणि मॅच फिक्सिंग असल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारे निवडणुका होत असतील, तर हा महाराष्ट्रातील आणि देशातील मतदारांचा अपमान आहे. मॅच फिक्सिंग झालं असल्याने निकाल अगोदरच ठरलेला असल्याचे ते म्हणाले. केंद्रात, राज्यात, महानगरपालिकेत, जिल्हा परिषदेत ‘आम्हीच पाहिजे’ यासाठी हे सर्व सुरू असल्याचा हल्लाबोल राज यांनी भाजपवर केला. सध्याची लढाई ही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी आहे, कारण पूर्वी वल्लभभाई पटेल यांनी मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध केला होता. मतदार याद्यांमध्ये बोगस मतदारांची नोंदणी करणे हा या योजनेचा एक भाग आहे, जेणेकरून सर्व सत्तास्थाने ताब्यात घेता येतील. जमीन एकदा हातातून गेली की अस्तित्व संपते, असे राज म्हणाले. 

तेव्हा मराठी म्हणून कोणालाही सोडले जाणार नाही (Marathi voter fraud Maharashtra

राज यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आसाममधील भाषणाचा दाखला दिला, ज्यात मोदींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. मोदींनी तेव्हा आरोप केले होते की, निवडणूक आयोग निवडणुकीत रिगिंग (Rigging) आणि हिंसा रोखण्यात अपयशी ठरला आहे. तसेच, आयोगाने कोणत्या सरकारने त्यांना बसवले आहे, यावर काम न करता निष्पक्ष निवडणूक (निष्पक्ष चुनाव) करणे ही त्यांची जबाबदारी आहे. भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनी हे लक्षात ठेवावे की, ज्या वेळेस गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल, तेव्हा मराठी म्हणून कोणालाही सोडले जाणार नाही. राज यांनी सर्व मतदारांना सतर्क राहण्याची विनंती केली. यादी प्रमुख, शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष आणि गटाध्यक्ष यांना घरोघरी जाऊन तपासणी सुरू करण्याचे निर्देश दिले. एका घरात आठ-आठ माणसे भरली जात आहेत; खोट्या नावांची नोंदणी तपासण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

राज यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • राज यांनी नरेंद्र मोदी (तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री) यांचे एक जुने भाषण ऐकवले, ज्यात मोदींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. राज ठाकरे म्हणाले की, आम्ही आज निवडणूक आयोगाला तेच सांगतो, 'तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात'.
  • निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी लोक का चिडतात? कारण त्यांनी सगळं शेणं खाऊन ठेवलं आहे. 
  • निवडणूक आयोगाने 25 जुलैपर्यंत (अगोदर) नाव काढू नका आणि टाकू नका, असे सांगितले होते. यामुळे तरुण झालेल्या मुलांना मतदानाचा हक्क मिळण्यापासून वंचित ठेवले जात आहे. 
  • फक्त मनसेनेच नाही तर इतर पक्षांनी देखील प्रत्येक घराघरामध्ये जाऊन याद्या तपासल्या पाहिजेत.
  • मागील विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश (232 आमदार) मिळूनही महाराष्ट्रात सन्नाटा (शांतता) होता आणि विजयी झालेले लोकही कसे निवडून आलो हे समजू शकले नव्हते.
  • राज ठाकरे यांच्या सभेत गर्दी होते, पण ती मतांमध्ये येत नाही, कारण सध्या सुरू असलेल्या पद्धतीमुळे स्थानिक पक्षांना संपवून टाकण्याचे आणि मिटवून टाकण्याचे काम चालू आहे.
  • सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच भर व्यासपीठावर मतदार यादीतील घोळ आणि मतदारांना बाहेरून आणल्याचे कबूल केले आहे.
  • मतदारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया दर्शवतात की, त्यांच्या मताला किंमत राहिलेली नाही.
  • सर्वसामान्य माणसाला प्रामाणिकपणे मतदान करता येत नसल्याचे मतदारांचे मत आहे.
  • अनेकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली, जेणेकरून पारदर्शक निवडणुका होतील आणि विरोधकांची मागणी योग्य आहे, या मागणीला जनतेने साथ दिली पाहिजे. 
  • एका मतदाराने सांगितले की, निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मुंबईत सन्नाटा होता आणि हे फक्त मॅनिपुलेशनमुळे शक्य झाले आहे.
  • राज्यात, केंद्रात, महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषदेत सत्ता मिळवून संपूर्ण महाराष्ट्र अदानी आणि अंबानीला 'आंदण' म्हणून देण्याची योजना आहे.
  • मुंबईवर हात घालण्यापूर्वी ठाणे जिल्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, आणि पालघरपासून सुरू झालेल्या भागातून या योजनेची सुरुवात झाली आहे.
  • सध्याचे मुंबई विमानतळ अदानीच्या हातात आहे. इथले ऑपरेशन्स हळूहळू कमी करून नवी मुंबईला नेणार आणि कार्गो वाडवणला नेऊन मुंबई विमानतळाची संपूर्ण जमीन अदानीच्या घशात घालणार.
  • ठाणे जिल्ह्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (नॅशनल पार्क) आतल्या जागेत जंगलतोड करून आदिवासींना हटवून अदानीला पॉवर प्रोजेक्ट (Power Project) काढायचा आहे.
  • मुंबई आणि महाराष्ट्रात होणारी प्रगती जर मराठी माणसाच्या थडग्यावर होणार असेल, तर ती खपवून घेणार नाही.
  • सी-लिंक आणि अटल सेतू सारखे रस्ते सामान्य लोकांसाठी नसून, जमीन ताब्यात घेतलेल्या उद्योगपतींसाठी आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Pune Land Scam:  'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
Pune Land Scam: 300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
Palak Muchhal Reaction On Smriti Palash Wedding: स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
Embed widget