एक्स्प्लोर

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राची लोकधारा लावणी कार्यक्रम, भाजपकडून आक्षेप

Ahmednagar Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राची लोकधारा लावणी कार्यक्रमावर भाजपकडून आक्षेप घेतला जात आहे.

अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात 'महाराष्ट्राची लोकधारा लावणी' चा कार्यक्रम होणार असल्याचे बॅनर समाज माध्यमात व्हायरल होत आहे. हाच बॅनर पोस्ट करत भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे (Sachin Potare) यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत जामखेडचे आमदार राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे युवा नेतृत्व रोहित पवार यांचा आज वाढदिवस असून या निमित्ताने मतदारसंघात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर कर्जत (Karjat) शहरातील दादा पाटील महाविद्यालयातील (Dada Patil Collage) शारदाबाई पवार सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राची लोकधारा लावणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावरूनच नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमावरून भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आक्षेप घेत फेसबुक पोस्टद्वारे निषेध नोंदवला. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावणीचा कार्यक्रम घेणे हे कॉलेज प्रशासनाला पटतय का? सरकार काय कारवाई करणार असा सवाल पोटरे यांनी फेसबुक पोस्ट माध्यमातून केला आहे.

काय म्हटलंय फेसबुक पोस्टमध्ये? 

अहमदनगर भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ज्या पोस्टमध्ये 'रयतच्या जनरल बॉडी सदस्य असलेल्या आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या राजकारणाचा अड्डा केलेल्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी मागच्या आठवड्यात  'जय श्रीराम' च्या घोषणा दिल्यामुळे कॉलेज प्रशासनाने या सर्वांना दिवसभर अमानुषपणे डांबून ठेवून नापास करण्याची धमकी दिली. मात्र तिथेच आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावणीचा कार्यक्रम घेणे हे कॉलेज प्रशासनाला पटतंय का? सरकार काय कारवाई करणार? उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या शिक्षण संस्थेत चाललेला राजकिय हस्तक्षेप बंद करणार का? हे सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांना पडलेले प्रश्न आहेत. जय श्री राम‌‌ नाही तर लावणी पण नाही. 

Happy birthday आमदार साहेब..अशी पोस्ट केली आहे...या पोस्टमुळे राजकिय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली असून यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

नेमका काय कार्यक्रम ?

आज आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत येथील आमदार रोहित दादा पवार मित्र मंडळाने महाराष्ट्राची लोकधारा लावणी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. यात उत्पाद लावणी मंडळ पंढरपूर यांच्यासह नंदा-उमा इस्लामपूरकर भगिनी यांचा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकधारा, लोक रंग, लावणीचा प्रवास, ढोलकी व लावणीच्या प्रात्यक्षिकांसह सादरीकरणाचे नियोजन केलेले आहे. अस्सल मराठमोळ्या लोककलेचा देवघरापासून ते फडापर्यंतचा वाटचालीचा उलगडा करून देणारा हा कार्यक्रम असल्याचं या पोस्टरवर म्हटला आहे. हा कार्यक्रम उद्या तीन ते सहा या वेळेत हा कार्यक्रम होणार असून कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि आता याच कार्यक्रमावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाची बातमी : 

Ahmednagar : परिस्थितीने तिला नवऱ्याची 'आई' बनवले अन् तिने साता जन्माची साथ निभावली; करारी सोनालीचा धडाडीचा जीवनसंघर्ष! 

ही आहे फेसबुक पोस्ट : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Embed widget