(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar: रोहित पवार भावी मुख्यमंत्री, पुण्यानंतर आता नगरमध्येही लागले बॅनर्स; चर्चेला उधाण
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर आणि केकवर त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.
अहमदनगर: राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यानंतर पवार कुटुंबीयातून रोहित पवार (Rohit Pawar) भावी मुख्यमंत्र्यांच्या रांगेत आलेले आहेत. पुण्यापाठोपाठ आता जामखेडमध्येही राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर आणि केकवर त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. सध्या हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे..
दोन दिवसांपूर्वी मावळ, त्यानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावरही असाच पद्धतीने बॅनर लागले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार रोहित पवार आक्रमक झालेले दिसत आहेत.. बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी जबाबदारी आहे. जामखेड येथील कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्तेंनी आ. रोहित पवार भावी मुख्यमंत्री असे लिहिला केक आणला यावर शरद पवार यांचा फोटो आहे तर मंत्रालयाचाही फोटो आहे.
होर्डिंगची चर्चा
राष्ट्रवादीतून पहिला अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे बोर्ड लावले होते. त्यावर संख्याबळ नसल्याने मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं सांगत अजित पवारांनी असे बोर्ड लावू नयेत अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाजवळ सुप्रिया सुळे यांचाही अशाच पद्धतीने बोर्ड लावण्यात आला होता. त्याच्यानंतर आमदार जयंत पाटील यांचेही भावी मुख्यमंत्री असे बोर्ड झळकले होते. आता दुसऱ्यांदा आमदार झालेल्या रोहित पवारांचा उल्लेखही त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून केला आहे. याची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवर टीका केली होती. कितीही जन्म घेतले तरीही रोहित पवार हे अजित पवार होऊ शकणार नाही असं सुनील तटकरे म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, मला अजितदादांसारखं व्हायचं नाही. अजित पवार हे मोठे नेते आहेत. मी राजकारणात आलोय ते नेता बनण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या होर्डिंगवर अजित पवार म्हणाले होते की, कोणाचे किती बोर्ड लागले याला अर्थ नाही. मात्र जोपर्यंत 145 ची मॅजिक फिगर गाठत नाही तोपर्यंत होर्डिंगला काहीच अर्थ नाही.
हे ही वाचा :