Rohit Pawar : चॉकलेट बॉयवर मोठं प्रेशर, पण सरकारवर काढता येत नाही, आमदार रोहित पवार पडळकरांवर बरसले!
Ahmedngar News : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी चॉकलेट बॉय म्हणत गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे.
अहमदनगर : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalakr) यांच्यावर सध्या धनगर समाजातील (Dhangar Aarskhan) आरक्षणाचा प्रश्नांमुळे मोठे प्रेशर आहे, मात्र ते प्रेशर सरकारवर काढता येत नाही. त्यामुळे पडळकर ते प्रेशर खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच नाव घेतात, अशी टीका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.
आमदार गोपीचंद पडळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून अजित पवार गटाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीकडून आंदोलन केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, एकीकडे धनगर आरक्षणाचा ( Dhangar Reservation) मुद्दा पेटला असून समाजाकडून आंदोलन केले जात आहेत, त्यामुळे पडळकरांवर प्रेशर आहे. दुसरीकडे पडळकर याचंच सरकार सत्तेत असल्याने त्यांची गोची झाली झाल्याचे रोहित पवार म्हणाले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यावर बोलताना कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलय की, भाजपचे छोटे नेते जेव्हा एखाद्यावर टीका करतात, तेव्हा भाजपचे मोठे नेते शांत बसत असतात. यातून असा निष्कर्ष निघतो की भाजपच्या या छोट्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा आहे. मात्र त्याबरोबर आश्चर्य या गोष्टीचे वाटते की शरद पवार, सुप्रियाताई यांच्याबरोबर भाजप बरोबर गेलेले अजित पवार यांच्यावरही चॉकलेट बॉय गोपीचंद पडळकर टीका करत असताना अजित पवार यांच्याबरोबर गेलेले मोठमोठे नेते शरद पवार यांच्या विरोधात मोठमोठी भाषणे करतात, मात्र आता तेही गप्प बसले आहेत, याचे आश्चर्य वाटतं आहे. चॉकलेट बॉय गोपीचंद पडळकर यांची भूमिका नेहमी वेगवेगळी असते. सत्तेत असताना धनगर आरक्षणाचा प्रश्न यावर भूमिका वेगळे मांडतात आणि सत्तेत नसताना वेगळे मत मांडतात. त्यामुळे सध्या त्यांच्यावर धनगर आरक्षण प्रश्न समाजाचे मोठे प्रेशर आहे, मात्र ते प्रेशर सरकारवर काढता येत नसल्यामुळे ते खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचे नाव घेतात, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
भाजपचे मोठे नेते शांत बसतात
भाजपने असे काही नेते निर्माण केले आहेत ज्यांची बौद्धिक क्षमता कमी आहे. त्यामुळे ते जे मनाला येईल, तशी गरळ ओकतात. कधी कधी खालच्या पातळीवर बोलतात. मात्र हे छोटे नेते जेंव्हा असं काही बोलतात, तेंव्हा भाजपचे मोठे नेते शांत बसतात. त्यावरून या छोट्या नेत्यांच्या वक्तव्याला मोठ्या नेत्यांची संमती असते की काय अशी शंका येते, असं रोहित पवार म्हणाले, विशेष म्हणजे अजित दादा सोबत गेलेले मोठे नेते हे अशा नेत्यांच्या वक्तव्यावर शांत बसतात, याचाही आश्चर्य वाटतं असं रोहित पवार म्हणाले.
इतर महत्वाची बातमी :