Shirdi Sai Darshan : शिर्डी साई भक्तांसाठी महत्वाची बातमी! पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य, काय आहे नवी नियमावली?
Shirdi Sai baba Darshan : साईबाबा संस्थानने पेड दर्शन पास व आरती पासेससाठी (Saibaba) आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य केले आहे.
शिर्डी : राज्य नव्हे तर देशभरातून हजारो साई भक्त (saibaba) दररोज शिर्डीत हजेरी लावतात. यातील अनेकजण पेड दर्शनपास (Darshan) घेऊन दर्शन घेतात. तर अनेक जण आरतीच्या पाससाठी रांगेत उभे राहतात. याचाच फायदा अनेकदा काही एजंट घेतात व साई भक्तांची फसवणूक होत असल्याचं समोर आल होत. या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने (Shirdi saibaba) आता पेड दर्शनपास व आरती पास साठी ओळखपत्र अनिवार्य केले असून जो साईभक्त पेड दर्शन पास घेईल किंवा ज्याला आरती करायची आहे. त्याच्याच नावाने ओळखपत्राची एन्ट्री करून पास दिला जाणार आहे.
साईबाबांच्या दर्शनाला (Saibaba Darshan) जगभरातील भाविक येतात. अनेकदा सामान्य दर्शन रांगेत असलेली गर्दी पाहून पेड दर्शनपास हा पर्याय निवडून अनेक जण पेडदर्शन पास घेतात व दर्शन करतात. तर आरती पास घेण्यासाठी सुद्धा अनेकदा भक्तांना रांगेत उभे राहावे लागत असते. मात्र हे सगळं होत असताना काही एजंट साई भक्तांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे तक्रारी साईबाबा संस्थानला प्राप्त झाल्या होत्या. साईबाबा संस्थानच्या sai.org.in ऑनलाईन पोर्टलवर या दोन्ही सुविधा उपलब्ध असल्या तरी अनेकदा या ठिकाणी पास मिळत नाही. त्यामुळे एजंट याचा फायदा घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली आहे.
साईबाबा संस्थानला आलेल्या तक्रारीनंतर आता साईबाबा संस्थानने पेड दर्शन पास व आरती पासेससाठी (Saibaba Aarati) आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य केले आहे. सामान्य दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासाठी कुठल्याही पाचची आवश्यकता नाही. मात्र पेड पाच दर्शन किंवा आरती पास घ्यायचा असेल तर ओळखपत्र (Identity Card) हे अनिवार्य असणार आहे. यासाठी तिरुपती बालाजीच्या धरतीवर असणारा सॉफ्टवेअर साईबाबा संस्थांनाअपडेट केला असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन निर्णयाची अंमलबजावणी साईबाबा संस्थानने सुरू केले असून पेड पाच दर्शन घेताना आता ओळखपत्राचाही एन्ट्री या नवीन सॉफ्टवेअरमध्ये केली जाते. त्याचबरोबर आरती पाससाठी आरतीला उपस्थित असणाऱ्या सर्वच भक्तांची ओळखपत्र ही सुद्धा अनिवार्य करण्यात आली आहे. नवीन निर्णयानंतर अनेक साई भक्तांनी पास मिळण्यास उशीर होत असला तरी हे सुरक्षित असल्याचं सांगत या निर्णयाचा स्वागत केलं आहे.
सामान्य दर्शन रांगेतून थेट प्रवेश
दरम्यान शिर्डी साईभक्तांसाठी संस्थानने हा निर्णय घेतला असून पेड दर्शनपास व आरती पास साठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच पेड दर्शनपाससाठी एकाचे ओळखपत्र तर इतरांचे नाव अनिवार्य असणार आहे. आरती पाससाठी आरतीला असणाऱ्या सर्व सदस्यांचे ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. तसेच Online दर्शनपास कोटा प्रती तास 500 वरून 1000 प्रती तास करण्यात आला आहे. शिर्डी संस्थानच्या sai.org.in. या अधिकृत वेबस्थळावर पेड दर्शनपास व आरतीपास उपलब्ध असून सामान्य दर्शन रांगेतून थेट प्रवेश दिला जाणार असून यासाठी कोणतीही अट नसणार आहे.
इतर महत्वाची बातमी :