Shasan Aplya Dari : दोन आठवड्यांपासून 'शासन आपल्या दारी'चा मांडव घातलाय, दोन तारखा बदलल्या, नेमका खर्च कोण करतंय?
Ahmednagar News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्या जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम दोनवेळा पुढे ढकलण्यात आला.
![Shasan Aplya Dari : दोन आठवड्यांपासून 'शासन आपल्या दारी'चा मांडव घातलाय, दोन तारखा बदलल्या, नेमका खर्च कोण करतंय? maharashtra news Ahmednagar news Two dates have been changed for Shirdi's shasan apalya dari now scheduled for August 11 Shasan Aplya Dari : दोन आठवड्यांपासून 'शासन आपल्या दारी'चा मांडव घातलाय, दोन तारखा बदलल्या, नेमका खर्च कोण करतंय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/08/1ed13d03f196ba54f367d6e1a472a4631691494124271738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ahmednagar News : शासन आपल्या दारी (Shasan Aplya Dari) या उपक्रमांतर्गत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मोठा कार्यक्रम घेत आहेत. विविध शासकीय योजनांच्या प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा शासनाच्या वतीने केला जात आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) विमानतळाजवळील काकडी गावात 11 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मागील दोन आठवड्यापासून या कार्यक्रमासाठी मांडव उभारण्यात आलेला असून हा सगळा खर्च कोण करतंय, याच उत्तर मात्र गुलदस्त्यात असल्याचे समजते.
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सर्वत्र सुरू झालेला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन केले जाते. नगर जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम दोनदा तारखा ठरवून पुढे ढकलण्यात आला आहे. अशातच पुन्हा नवी तारीख देण्यात आली असून आता 11 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा कार्यक्रम दोनदा पुढे ढकलला गेल्याने अनेक दिवसांपासून या ठिकाणी उभारलेला मांडव मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा करत आहे. यापूर्वी सहा ऑगस्ट त्यानंतर सात ऑगस्ट अशा दोन तारखा घोषित करण्यात आल्या, मात्र मुख्यमंत्र्यांची तारीख न मिळाल्याने आता 11 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार असल्याचं बोललं जातं आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्या जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम दोनवेळा पुढे ढकलण्यात आला. मात्र आता 11ऑगस्ट रोजी शिर्डीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी लाभार्थ्यांना आणण्यासाठी विशेष बसचे आयोजन केले असून, कोट्यवधी रुपयांच्या खर्च यासाठी प्रशासन करणार आहे. मागील महिन्यातील शेवटच्या आठवड्यात या मांडवाचं काम सुरू केलं. 6 ऑगस्टला मुख्यमंत्री येणार हे निश्चित झाल, मात्र अचानक सहा ऑगस्टचा कार्यक्रम जेजुरी येथे संपन्न झाला. आता शिर्डी येथील कार्यक्रमासाठी 11 ऑगस्ट ही तारीख ठरवण्यात आली आहे, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या मांडवाचा जो खर्च आहे, तो कोण करतय आणि हा सगळा खर्च जनतेच्या पैशातूनच होत असेल तर हा जनतेच्या पैशाचा अपव्य नाही का? असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
शिर्डीला तिसरी तारीख मिळाली...
शिंदे फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे. नुकताच हा कार्यक्रम जेजुरी येथे संपन्न झाला. त्यानंतर आता शिर्डी येथे हा कार्यक्रम होणार असल्याची चर्चा आहे. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमावर कोट्यवधी रुपयांची उधळण चालवली जात असल्याचे समोर आले आहे. यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. दुसरीकडे या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपासाठी मात्र अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. कारण याआधी दोन वेळा हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्यानंतर आता तिसरी तारीख या कार्यक्रमासाठी देण्यात आली आहे. मात्र पहिल्या तारखेपासूनच हा मांडव उभारण्यात आला होता. त्यामुळे या मांडवाचं नेमका खर्च कोण करतय प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर संबंधित बातम्या :
Jejuri Shashan Aplya Dari : कोणाची सभा, कशाचे लाभार्थी, माहितच नाही; फोन आला आणि बसमध्ये बसून आलो!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)