एक्स्प्लोर
Advertisement
चिमुरड्या 'सह्याद्री'ने अवघ्या चौथ्या वर्षी केला लिंगाणा किल्ला सर
तिने केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय पाठीशी उभे राहिलेत. इतिहासाचा इ माहित नसलेल्या वयात सह्याद्रीने गडकिल्ल्यांचे रक्षण आणि संवर्धनाचा केलेला संकल्प नक्कीच कौतुकास्पद आहे. या संकल्पात यश येण्यासाठी सावित्रीच्या या लेकीला सह्याद्री इतक्या शुभेच्छा.
पिंपरी : चार वर्षीय चिमुरड्यांचे नव्या वर्षाचे संकल्प तुमच्या मते काय असू शकतात. मी रोज अभ्यास करेन, न चुकवता शाळेत जाईन, मोबाईलवर गेम खेळणार नाही वगैरे-वगैरे. मात्र पिंपरीतल्या चार वर्षीय लेकीने विचारा पलीकडचे आणि अगदी नावाला साजेसा संकल्प केला आहे. पिंपरी चिंचवडमधील सह्याद्री भुजबळ या चिमुकलीने हा संकल्प थेट तीन हजार फूट उंचीवर जाऊन केला आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेला. दिसताच क्षणी अंगावर काटा आणणारा असा लिंगाणा किल्ला. मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड आणि राजगडच्या मध्ये हा किल्ला उभारला.
तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे, मध्येच व्यत्यय आणण्यासाठी आवासून उभा असणारा सोसाट्याचा वारा. असा अनेक अंगांनी चॅलेंजिंग असणारा हा किल्ला गिर्यारोहकांना रॅपलिंगद्वारे सर करावा लागतो. त्यामुळंच हा किल्ला सर करणं कुणा ऐऱ्या-गैऱ्याचं काम नव्हे, पण पिंपरी चिंचवडमधील चार वर्षीय चिमुरडी सह्याद्री भुजबळने तो सर केला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इतिहासाची साक्ष देणारा लिंगाणा सर करून या रणरागिणीने गडकिल्ल्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे.
सह्याद्रीचे वडील महेश भुजबळांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्याखालून घालतानाच गडकिल्ले अनुभवण्याचा नाद लागला. तो जोपासत असतानाच विवाह केला अन मग कन्यारत्न झालं. तिचं नाव सह्याद्री ठेवत अकराव्या महिन्यातच राजधानी रायगडावर जाऊन महाराजांचा आशीर्वाद घेत तिचा ही गडकिल्ल्यांची भटकंती सुरु झाली. रायगड, लोहगड, सिंहगड, तुंग, हडसर, शिवनेरी, जंजिरा, सुधागड, पन्हाळा, मल्हारगड, राजमाची, तोरणा, राजगड आणि आरा लिंगाणा अशा अवघड चढाया पूर्ण केल्या आहेत. आता तिने केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय पाठीशी उभे राहिलेत. इतिहासाचा इ माहित नसलेल्या वयात सह्याद्रीने गडकिल्ल्यांचे रक्षण आणि संवर्धनाचा केलेला संकल्प नक्कीच कौतुकास्पद आहे. या संकल्पात यश येण्यासाठी सावित्रीच्या या लेकीला सह्याद्री इतक्या शुभेच्छा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement