(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : जुलैपर्यंत 14 रेल्वेगाड्या रद्द; रेल्वे बोर्डाचे निर्देश
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतून धावणाऱ्या 14 रेल्वेगाड्या जुलैपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच रामटेक-नागपूर आणि इतवारी-रामटेक मेमू पॅसेंजरही 9 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
नागपूरः रेल्वे बोर्डाने निर्देश दिल्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतून धावणाऱ्या 14 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या रेल्वेगाड्या जुलैपर्यंत रद्द राहणार असून यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रेल्वे बोर्डाने रेल्वेगाड्या रद्ध करण्याचे कारण स्पष्ट केले नसल्याची माहिती दपूम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, रद्द केलेल्या रेल्वेगाड्यांत 27 जून आणि 4 जुलैला 12767 नांदेड-सांतरागाछी एक्स्प्रेस, 29 जून आणि 6 जुलैला 12768 सांतरागाछी-नांदेड एक्स्प्रेस, 27, 30 जून आणि 4,7 जुलैला 12880 भुवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस. 29 जून आणि 2,6.9 जुलैला 12879 लोकमान्य टिळक टर्मिनल-भुवनेश्वर एक्स्प्रेस, 28 जून व 5 जुलैला 22866 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनल, 30 जून व 7 जुलैला 22865 लोकमान्य टिळक टर्मिनल-पुरी एक्स्प्रेस, 24,25 जून आणि 1,2 आणि 8 जुलैला 12812 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनल, 26,27 जून आणि 3,4 आणि 10 जुलैला 12811 लोकमान्य टिळक टर्मिनल-हटिया एक्स्प्रेस, 26 जून आणि 3 जुलैला 22847 विशाखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस, 28 जून आणि 5 जुलैला 22848 लोकमान्य टिळक टर्मिनल-विशाखापट्टनम एक्स्प्रेस, 27,28 जून आणि 4- 5 जुलैला 20843 बिलासपूर भगत की कोठी एक्स्प्रेस, 30 जून आणि 2,7 व 9 जुलैला 20844 भगत की कोठी बिलासपूर एक्स्प्रेस, 25,30 जून आणि 2,7,9 जुलैला 20845 बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेस आणि 28 जून 3,5,10 आणि 12 जुलैला 20846 बीकानेर-बिलासपूर एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.
दोन मेमू रेल्वेगाड्या रद्ध
25 जून ते 9 जुलैदरम्यान 08754 इतवारी-रामटेक मेमू पॅसेंजर स्पेशल आणि 08755 रामटेक-नागपूर पॅसेंजर रद्द राहणार आहे. तसेच 18239 गेवरा रोड - इतवारी एक्स्प्रेस 25 जून ते 9 जुलैपर्यंत कोरबा-गेवरा रोड दरम्यान रद्द राहमार आहे.