CM Uddhav Thackeray : स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला.
![CM Uddhav Thackeray : स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल Maharashtra Political Crisis CM Uddhav Thackeray criticizes on Eknath shinde CM Uddhav Thackeray : स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/ed5f94ee090dc4fe3843809f08ee461f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
CM Uddhav Thackeray : स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला. बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गटावर जोरदार निशाणा साधला.
दरम्यान, शिवसैनिकांना सेना भवनावर जमण्याचे आदेश देण्यात आलं आहेत. मोठं शक्तिप्रदर्शन करम्याच्या तयारीत शिवसेना असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शिवसेना कार्यकारिणीत उपस्थितांनी गद्दारांना परत घेऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरेंना केली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना परत घेणारच नाही असे बोलले. शिवसेना निखारा आहे.
त्यावर पाय ठेवला तर जाळून टाकू असा इशारा देखील ठाकरेंनी दिला. दरम्यान या कार्यकारिणीत महत्वाचे पाच ठराव देखील मांडण्यात आले आहेत. यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असे ठरवल्याचे असल्याचे वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठरावाला अतिशय महत्त्व आहे.
कोणते ठराव मंजूर?
- निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना, पहिला ठराव पारित, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक
- शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकरणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना देत आहे असा ठराव ही या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा ठराव शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडला होता.
- त्याशिवाय, बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या ठरावामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)