Admission : अकरावी प्रवेश, केंद्रीय प्रवेश समितीकडून तपासणीत भेदभाव!
शहरालगतच्या महाविद्यालयात अनियमितता असताना संरक्षण दिले जाते. अधिक रिक्त जागा असतानाही काही विशिष्ट महाविद्यालयांची दरवर्षी क्षमता वाढवली जात असल्याचा आरोप केंद्रीय प्रवेश समिती सद्सयांनी केला आहे.
नागपूरः केंद्रीय प्रवेश समितीच्यावतीने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. मात्र, केंद्रीय समितीकडून केवळ शहरातील महाविद्यालयांची तपासणी केली जात आहे. शहरालगतच्या कनिष्ठ महाविद्यालयांना मोकळे सोडून भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप समितीमधील काही सदस्यांनी केला आहे. गेल्या काही वर्षात शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या रिक्त जागांचे प्रमाण सतत वाढत आहे. मात्र, असे असतानाही काही विशिष्ट महाविद्यालयांना नवीन तुकड्यांची मान्यता मिळते. त्यांच्याकडे सोयी-सुविधा नसताना ते इतके विद्यार्थी बसवितात कुठे हा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. मात्र, उपसंचालक आणि माध्यमिक स्तरावर प्रकरणे मॅनेज होत असल्याचे दिसून येते.
त्यामुळे केंद्रीय प्रवेश समितीचे सदस्य राजेंद्र बा. झाडे व रवींद्र फडणवीस यांनी शिक्षक उपसंचालकांना 23 जून रोजी पत्र लिहून समितीच्या कामकाजाबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले. समितीच्या सभासदांना विश्वासात न घेता प्रशासनच प्रेशासंबंधी सर्व निर्णय घेत आहेत. संचालकांच्या आदेशानुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करणे अनिवार्य असताना फक्त मोजक्याच व त्यातही शहरातील महाविद्यालयांचीच तपासणी केली जात आहे.
शहरालगतच्या महाविद्यालयात अनियमितता असताना त्यांना संरक्षण दिले जात आहे. परस्पर महाविद्यालयांच्या तुकड्या वाढवण्यात येत असून शहरात रिक्त जागांचे प्रमाण अधिक असतानाही दरवर्षी काही विशिष्ट महाविद्यालयांची दरवर्षी क्षमता वाढवली जात आहे. त्यासाठी महाविद्यालयाची भौतिक सुविधा व प्रशिक्षित शिक्षक आहेत अथवा नाही याची शहनिशा केली जात नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nagpur : उपराजधानी बनतेय 'हुक्का पार्लर हब'! शहरात अनेक ठिकाणी भरते नशेची मैफिल
RTMNU : अखेर नागपूर विद्यापीठाला आली जाग; विद्यार्थ्यांची होणारी 'अतिरिक्त शुल्क लूट' थांबणार
NMC : 73 सफाई कर्मचारी कामावरुन गायब; झोनमधील अस्वच्छतेवरून धरमपेठ झोनच्या स्वच्छता निरीक्षकालाही नोटीस
Nagpur : अतिक्रमण पथक येण्यापूर्वीच मिळते 'टीप'; कारवाईनंतर लगेच 'जैसे थे'
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI