एक्स्प्लोर

Israel vs Iran War: इराणमध्ये नरसंहार! 200हून अधिक लोकांचा मृत्यू; तेहराननेही क्षेपणास्त्रे डागली; संरक्षण मंत्री, IRGC कमांडरसह यातुल्ला अली खामेनींचाही मृत्यू

Iran Israel US War: अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांचा परिणाम इराणच्या 24 प्रांतांवर झालाय. परिणामी इराणमध्ये 201 लोक ठार आणि 747 लोक जखमी झाल्याची माहिती आहे.

Israel Iran US War : संपूर्ण जगाची चिंता वाढणवणारी एक बातमी समोर आली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धासंदर्भात (Israel vs Iran War) एक अतिशय मोठी आणि महत्तवाची अपडेट समोर आली. अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणेचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei) यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलातर दुसरीकडे शनिवारी (28 फेब्रुवारी 2026) इस्रायल आणि अमेरिकेने इराणी राष्ट्रपती भवनासह अनेक ठिकाणी हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमधील, तेल अवीवमधील आणि इस्रायलमधील इतर ठिकाणी असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यात 85 शाळकरी मुलींचाही समावेश आहे. (Iran Supreme Leader Ali Khamenei Death News)

दरम्यान, इस्रायली हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री अमीर नासिरजादेह आणि अनेक आयआरजीसी कमांडर मारले गेल्याचे दावेही केले जात आहेत. इस्रायलने म्हटले आहे की, इराणी राजवट उलथवून टाकण्याच्या उद्देशाने केलेल्या या कारवाईची तारीख काही आठवडे आधीच निश्चित करण्यात आली होती.

Iran Israel War Update : इराणमध्ये 200 हून अधिक मृत्यू

इराणी माध्यमांनुसार, अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात 201 इराणी मारले गेले आणि 747 जखमी झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन उद्दिष्टे सांगितली: पहिले, इराणी नौदल नष्ट करणे, दुसरे, इराणचा क्षेपणास्त्र उद्योग नष्ट करणे आणि तिसरे, इराण अण्वस्त्रे मिळवू शकत नाही याची खात्री करणे. ट्रम्प यांनी अमेरिकन लोकांच्या संभाव्य जीवितहानीबद्दल इशाराही दिला. किंबहुना, इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रत्युत्तर विनाशकारी असेल. इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील तेहरान, तब्रिझ, केरमानशाह, कोम, कारज आणि इस्फहानवर हल्ला केला. हल्ल्यानंतर तेहरानवरील आकाशात धुराचे लोट पसरले.

Iran on US : इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला

या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधील अल उदेद हवाई तळ, कुवेतमधील अल सलेम तळ, युएईमधील अल धफ्रा हवाई तळ, बहरीनमधील अमेरिकेचा पाचवा फ्लीट तळ, सौदीची राजधानी रियाध आणि इस्रायली शहर हैफा आणि गॅलीलमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रे डागली. फ्रान्स, जर्मनी आणि युनायटेड किंग्डमने एक संयुक्त निवेदन जारी करून मागणी केली की, "इराणने आपला अणुकार्यक्रम सोडून द्यावा आणि त्याचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवावा. आपल्या देशांना अस्थिर करणाऱ्या कारवाया टाळाव्यात. इराणने स्वतःच्या लोकांविरुद्ध करत असलेला भयानक हिंसाचार आणि दडपशाही थांबवावी."

फ्रान्स, जर्मनी आणि युनायटेड किंग्डमने संयुक्त निवेदन केले जारी (France, Germany and the United Kingdom)

फ्रान्स, जर्मनी आणि युनायटेड किंग्डमने स्पष्ट केले की ते हल्ल्यात सहभागी नव्हते, परंतु अमेरिका, इस्रायल आणि इतर देशांच्या संपर्कात आहेत. निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही इराणने या प्रदेशातील देशांवर केलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. इराणने अंदाधुंद लष्करी हल्ले टाळावेत. आम्ही संवाद पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करतो आणि इराणी नेतृत्वाला वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन करतो. शेवटी, इराणी लोकांना त्यांचे भविष्य स्वतः ठरवण्याची परवानगी दिली पाहिजे."

संबंधित बातमी:

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, आता रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विनवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विनवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget