SSR Suicide Case | सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी निर्माता संदीप सिंह विरोधात तक्रार दाखल
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सुशांतचे कौटुंबिक मित्र निलोत्पल मृणाल यांनी सुशांतचा जवळचा मित्र चित्रपट निर्माता संदीप सिंह यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड विश्वात प्रचंड खळबळ माजली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन बॉलिवूडमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची चौकशीही केली जात आहे. अशातच आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. सुशांतचे कौटुंबिक मित्र निलोत्पल मृणाल यांनी सुशांतचा जवळचा मित्र चित्रपट निर्माता संदीप सिंह यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
निलोत्पल यांनी डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना एक पत्र लिहून सुशांतचा जवळचे मित्र संदीप सिंह यांच्याद्वारे मीडियाशी बोलताना बॉलिवूडला 'क्लीन चिट' देणं आणि सुशांतचा मृत्यू सामान्य असल्याचं सांगितल्याचा आरोप लावत आक्षेप नोंदवला आहे.
निलोत्पल यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये संदीप सिंहच्या अशा बोलण्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. निलोत्पल म्हणाले की, ' संदीप सिंह बॉलिवूडला क्लीन चिट देणारा आणि सुशांतच्या मृत्यू सामान्य म्हणणारा आहे कोण? तो कोणाला वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, किंवा बॉलिवूडमधील कोणी त्याला हे सगळं करायला सांगितलं आहे का? याबाबत चौकशी करण्याची गरज आहे.'
निलोत्पल यांचं म्हणणं आहे की, मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यांनी आतापर्यंत कोणत्याच बाबतमी क्लिन चीट दिलेली नाही. अशातच संदीप सिंह यांनी याप्रकरणी कोणत्याही प्रकारची क्लीन चिट देणं योग्य नाही. तसेच पुढे बोलताना निलोत्पल म्हणाले की, जर संदीप सिंह यांना याप्रकरणाबाबत कोणतीही माहिती असेल, तर त्यांनी यासर्व गोष्टी मीडियाला न सांगता मुंबई पोलिसांना सांगाव्यात. तसेच संदीप सिंह यांचा मोबाईल जप्त करून त्याची फॉरेंसिक तपासणी करण्यात यावी, जेणेकरून सुशांतच्या मृत्यूशी निगडीत रहस्यांचा खुलासा करणं सोपं होईल, असंही निपोत्पल यांनी सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ : नाना पाटेकर सुशांत सिंह राजपूतच्या घरी, कुटुंबियांचं सांत्वन
निलोत्पल यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रानुसार, संदीपने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, सुशांतचा मृत्यूनंतर त्यांना अनेक दिग्गजांनी फोन केला होता. त्यामुळे याबाबतीत चौकशी होणं गरजेचं आहे. यामुळे नक्की ते दिग्गज कोण होते? आणि हे कोणत्याही दबावामुळे तर असं वक्तव्य करत नाहीत ना? तसेच निपोत्पल यांनी सुशांतच्या घरातील नोकर आणि त्याच्या जवळच्या मित्रांच्या फोनची फॉरेंसिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. एबीपी न्यूजशी बोलताना निलोत्पल यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबियांना मुंबई पोलिसांच्या चौकशीवर विश्वास आहे. जर कुटुंबियांना पुढे जाऊन पोलिसांच्या चौकशीवर आक्षेप वाटला तर पुढे जाऊन सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय तपासणीचीही मागणी करू शकतात.
सदर प्रकरणी एबीपी न्यूजने संदीप सिंह यांचीही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. निलोत्पल यांनी त्यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीबाबत त्यांना काहीच माहिती नसून पोलिसांनी त्यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधलेला नाही.
महत्त्वाचं म्हणजे, निलोत्पल मृणाल सुशांत सिंह राजपूतचा चुलत भाऊ असून भाजप आमदार नीरज कुमार सिंह यांचे जवळचे मित्र आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पाटणा आणि हरियाणाहून मुंबईत आलेल्या सुशांतच्या नातेवाईक आणि इतर लोकांमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि सर्व तयारी करण्यासाठी निलोत्पलने महत्त्वाची भूमिका निभावली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; पोलिसांकडून यशराज फिल्म्सच्या दोन अधिकाऱ्यांची पाच तास चौकशी
सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळाला; समोर आलं मृत्यूचं खरं कारण
सुशांतच्या मित्राची भावुक पोस्ट; म्हणाला - 'त्याला त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच वाचवू शकत होती'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी व्यावसायिक वैमनस्याच्या अँगलचीही चौकशी करणार : अनिल देशमुख