एक्स्प्लोर
Advertisement
मार्वेल सिरीजमधील 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज; हॉलीवूड सुपरस्टार स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत
अवेंजर्स सिरीजमधील फेमस सुपरहिरो 'ब्लॅक विडो' या पात्रावर आधारित चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांसाठी अॅक्शन सीन्सची पर्वणीच असणार आहे.
मुंबई : हॉलिवूडच्या सुपरहिरोंची लोकप्रियता संपूर्ण जगभरात पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी मार्वेल सिरीजमधील अवेंजर्स एन्डगेम या चित्रपटाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला होता. अशातच आता आणखी एक सुपरहिरोचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटामध्ये अनेक अॅक्शन सीन्सची पर्वणी प्रेक्षकांसाठी असणार आहे. भारतातील हॉलिवूड अॅक्शन फिल्मच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. अवेंजर्स सिरीजमधील फेमस सुपरहिरो 'ब्लॅक विडो' या पात्रावर आधारित चित्रपट येत आहे. या चित्रपटातून ब्लॅक विडोचे अॅक्शन सीन्स पाहता येणार आहेत. त्याचबरोबर तिच्या भूतकाळाबाबतही समजण्यास मदत होणार आहे. सध्या मार्वेल स्टूडियोजच्या 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
पाहा ट्रेलर :
'ब्लॅक विडो' या चित्रपटात स्कारलेट योहानसन लीड रोलमध्ये दिसून येणार आहे. चित्रपटामध्ये नताशाची ब्लॅक विडो होण्याची कथा दाखविण्यात आली आहे. मार्वेल सिनेमॅटिक यूनिवर्सच्या चौथ्या फेजमधील हा चित्रपट आहे. 'ब्लॅक विडो' फ्लोरेंस येलेनाच्या रोलमध्ये आहे. तर डेव्हिड हार्बर अल्केसई उर्फ द रेज गार्डियन आणि रेचेल वीज मेलिनाच्या रोलमध्ये आहे. तसेच डेव्हिज हार्बर अल्केसई उर्फ रेड गार्डियन आणि रेचेल वीज मेलिनाच्या रोलमध्ये आहे. 'ब्लॅक विडो'च्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार असून ब्लॅक विडोच्या भूतकाळाची झलकही पाहायला मिळणार आहे.
स्कारलेट योहानसनचा 'ब्लॅक विडो' हा चित्रपट केक शॉर्टलँडने डायरेक्ट केला आहे. तर केविन फीज यांनी प्रोड्यूस केला आहे. 'ब्लॅक विडो' 30 एप्रिल 2020 मध्ये भारतात रिलीज होणार आहे. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू,मल्ल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या :
'दबंग 3'मधील गाणं रिलीज; सलमान-वरीनासोबत प्रभुदेवाचाही जबरदस्त डान्स
"अपराजित अयोध्या" कंगनाकडून राम मंदिरावरील चित्रपटाची घोषणा
'पहिला वार लाखमोलाचा'; 'तानाजी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
Panipat Trailer | जबरदस्त अॅक्शनने भरलेला 'पानिपत'चा ट्रेलर प्रदर्शित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement