LIVE UPDATE : पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रुग्णवाहिकेला अपघात, जीवितहानी नाही

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. जेजेपीला उपमुख्यमंत्रीपद दिल्यानं भाजपचा हरियाणातला सत्तास्थापनेचा मार्ग सुकर , महाराष्ट्रातही तोच पॅटर्न राबवणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष
2. अतिआत्मविश्वास आणि बंडखोरांमुळे युतीच्या जागा घसरल्या, माझाला दिलेल्या मुलाखतीत पवारांचं विश्लेषण, तर नवख्या आमदारांना मोलाचा सल्ला
3. आरेला कारे करणाऱ्या शिवसेनेशी राणेंची जुळवून घेण्याची भाषा, मनात द्वेषही नसल्याचं स्पष्ट, कणकवलीतल्या निकालानंतर राणेंची माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
4. वंचितनं खाल्लेल्या मतांमुळं तब्बल 32 मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव, प्रकाश आंबेडकरांनी आघाडीच्या सत्तेची वाट रोखल्याची चर्चा
5. परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर आता किनारपट्टीला क्यार वादळाचा धोका, कोकणात हाय अलर्ट, मुंबईतही परिणाम जाणवण्याची शक्यता
6. दीपोत्सवाचा सर्वत्र उत्साह, बाजारपेठा सजल्या, दीपोत्सवानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन























