LIVE UPDATE : धुळ्याचे विद्यमान आमदार तथा अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांचा स्ट्रॉंगरूमसमोर मुक्काम
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. यंदाच्या दिवाळीवर पावसाचं सावट, २२ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पावसाचा अंदाज, पुणे, मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
2. घड्याळासमोरील बटण दाबलं तरी मत कमळालाच जात असल्याचा मतदारांचा आरोप, साताऱ्यातल्या नवलेवाडीतील प्रकार, ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा विरोधकांचा आरोप
3. कुर्ल्यात पूर्व द्रुतगती मार्गावर संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक, बेपत्ता मुलीचा शोध न लागल्यानं वडिलांची आत्महत्या, लोकांचा संताप अनावर
4. हुबळी स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन उघड, स्फोटकांच्या पार्सलवर शिवसेना आमदार प्रकाश आबिटकरांचं नाव, प्रकरणाचं गूढ उकलण्यांच पोलिसांसमोर आव्हान
5. मतदानावरुन परतताना तराफा उलटला, शहापूरच्या बोराळा गावातील घटना, ९५ नागरिकांचा जीव थोडक्यात बचावला
6. राज्यात कुणाची सत्ता येणार आणि कोण बसणार विरोधी बाकांवर, राजकीय नेत्यांचा एक्झिट पोल आणि स्थानिक पत्रकारांचा अंदाज एबीपी माझावर