LIVE BLOG | काँग्रेसच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशिष देशमुखांना उमेदवारी

Background
१. भाजपच्या दुसऱ्या यादीतही खडसे, तावडे, बावनकुळे वेटिंगवरच, तर उल्हासनगरमधून कुमार ऐलानींना संधी, ओम कलानींच्या स्वप्नावर पाणी
२. पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातला सदस्य उमेदवारी अर्ज भरणार, वरळीत आदित्य ठाकरेंसाठी सेनेचं मोठं शक्तिप्रदर्शन, मनसेनं उमेदवार दिला नसल्यानं राज ठाकरेंच्या पाठिंब्याची चर्चा
३. विधानसभेसाठी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडांना उमेदवारी
४. मध्यरात्रीच्या सुमारास काँग्रेसकडून 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पंढरपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या नावांचा घोळ
५. तिकीट वाटपानंतर भाजपला बंडाळीची लागण, औशामध्ये निलंगेकर गटाचा अभिमन्यू पवारांना विरोध, तर भालेराव समर्थकांनी चंद्रकांत पाटलांचा रस्ता रोखला
६. हैदराबादच्या शेवटच्या निजामाचा 306 कोटींच्या खजिन्यावर भारताचाच हक्क, लंडनच्या कोर्टाचा निर्णय, पाकिस्तानला मोठा झटका























