एक्स्प्लोर
Advertisement
LIVE BLOG : कांदा निर्यातीवरील दहा टक्के अनुदान केंद्राकडून बंद
LIVE
Background
महत्त्वाच्या हेडलाईन्स
- मुंबईसह उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी , तिन्ही मार्गावरच्या लोकसेवा विस्कळीत, विमान वाहतुकीवरही परिणाम
- काँग्रेसची पारंपरिक मतं फोडण्यासाठी प्लॅन आखा, अमित शाहांचा नेत्यांना कानमंत्र, तर मुख्यमंत्रिपदासाठी भाजपनं रणनीती आखल्याने शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा
- आतापर्यंत ईव्हीएमवर संशय घेणाऱ्या शरद पवारांचं निवडणूक अधिकाऱ्यांकडेही बोट, तर ईव्हीएम पुराण सोडून विधानसभेच्या कामाला लागा, अजित पवारांचा घऱचा आहेर
- देशभर गाजलेल्या कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणातील 3 नराधमांना जन्मठेप, तर इतर तिघांना 5 वर्षांचा कारावास, पठाणकोट न्यायालयानं फाशीची मागणी फेटाळली
- सिक्सर किंग युवराज सिंहची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, घोषणा करताना युवराज भावूक, मात्र टी-20 लीगमध्ये खेळत राहणार
- राजधानी दिल्ली तापली, तब्बल 48 अंश सेल्सियस तापमानाची नोंद, तर केरळात मान्सूनच्या जोरदार सरी, देवभूमीतले पर्यटक सुखावले
23:01 PM (IST) • 11 Jun 2019
दादर चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य शासनाची मान्यता, हुतात्मा चौकाच्या धर्तीवर अखंड भीमज्योत, येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, महापालिका अधिकारी, आंबेडकरी संघटना, आमदारांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक
20:11 PM (IST) • 11 Jun 2019
शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागरांना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चेने सेनेत धुसफूस, विस्तारातील संभाव्य मंत्रिपदामुळे शिवसेनेतील आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा
20:02 PM (IST) • 11 Jun 2019
शिर्डीत अल्पवयीन मुलाची गोळ्या घालुन हत्या, शिवाजीनगर भागातील हॉटेल पवनधाम मधील घटना, हत्या करून करुन हल्लेखोर पसार , शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल
16:29 PM (IST) • 11 Jun 2019
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 13 जून रोजी ब्लॉक, मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास रोखली जाईल, ओव्हरहेड गँट्री बसवण्यासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबई लेनवर कामशेतजवळ गँट्री बसवण्यात येणार
16:25 PM (IST) • 11 Jun 2019
कांदा निर्यातीवर मिळणारे 10 टक्के अनुदान केंद्र सरकारने काढून टाकले, निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यासाठी डिसेंबर महिन्यापासून लागू झालेले अनुदान सहा महिन्यात बंद करण्याचा निर्णय, भविष्यात निर्यातीवर विपरीत परिणाम होऊन बाजारभाव पुन्हा कोसळण्याची शक्यता
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement