(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE BLOG : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली, राज ठाकरे यांची चौकशी होणार
LIVE
Background
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा
1. काश्मीर प्रकरण आता अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर, राजनाथ यांच्या इशाऱ्यानंतर पाक परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती, भारताकडून पाकची चौकी उद्ध्वस्त
2. माजी अर्थमंत्री अरुण जेटलींची प्रकृती चिंताजनक, दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात लाईफ सपोर्ट सिस्टमवर
3. आजपासून मुंबईत सीएनजीची पुरवठा सुरळीत होणार, उरणमधल्या ओएनजीसीच्या प्रकल्पातील तांत्रिक बिघाड दुरूस्तीच्या मार्गावर, महानगर गॅसची माहिती
4. 33 कोटी वृक्ष लागवड योजनेवर अभिनेता सयाजी शिंदेंची टीकेची कुऱ्हाड, मुनगंटीवारांना विचारले 5 सवाल, एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत
5. वेगवेगळ्या देशांच्या राजदूतांसमोर खासदार संभाजी राजेंनी मांडली पूरग्रस्तांची व्यथा, तर अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्याकडून 5 कोटींची मदत जाहीर
6. मराठवाड्यातल्या कृत्रिम पावसासाठी अखेर विमान भारतात दाखल, सोमवारपासून प्रयोगाला सुरूवात, लोणीकरांनी सांगितला नवा मुहूर्त
7. टीम इंडियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाला अर्जुन पुरस्कार; जाडेजासह १९ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड, पॅरा अॅथलीट दीपा मलिकला खेलरत्न