LIVE BLOG | सुप्रिया सुळेंबद्दल फेसबुकवर अपशब्द, तरुणाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा चोप
LIVE
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवड्याभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांचा मराठा विद्यार्थ्यांना दिलासा, कॉलेज निवडीसाठी आणखी 8 दिवस मिळणार
2.लोकसभेत उमेदवार न उतरवणाऱ्या मनसेची विधानसभेसाठी तयारी सुरू, रणनिती आखण्यासाठी ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा
3. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी, कमल हसन यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं, भाजपसह हिंदुत्त्ववादी संघटनांचा जोरदार पलटवार
4. नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती लागू, पहिल्याच दिवशी तेराशे जणांकडून 5 लाखांचा दंड, तर हेल्मेटसक्तीमुळे पुण्यात अपघाती मृत्यूचं प्रमाण घटलं
5. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या कारकिर्दीवर अनोखं संग्रहालय, स्वत: पवारांनीच एबीपी माझाला घडवली संग्रहालयाची सफर
6. आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचं चाहत्यांकडून जोरदार स्वागत, ढोलताशांच्या गजरात अंबानींच्या अँटिलियापासून मरिन ड्राईव्हपर्यंत जंगी मिरवणूक