एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE BLOG | कर्णबधिरांवर लाठीचार्ज प्रकरण, मुख्यमंत्र्यांकडून पुणे पोलिस आयुक्तांना उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
LIVE
Background
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 6 दिवस अधिवेशन चालणार, मराठा, सवर्ण, धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजणार
पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये लष्कराच्या वेगवान हालचाली, सैन्याच्या 100 तुकड्या काश्मीरमध्ये, पाकिस्तानच्या उरात धडकी
दहशतवादी हल्ल्यातील शहीद राजकारणाचे बळी, कोल्हापुरात राज ठाकरेंचा सरकावर गंभीर आरोप, अजित डोवालांच्या चौकशीचीही मागणी
प्रयागराजमध्ये मोदींची गंगेत डुबकी, कुंभमेळ्यातील सफाई कामगारांचे पाय धुतले, सफाई कर्मचाऱ्यांमुळेच दिव्यकुंभ भव्य झाल्याची प्रतिक्रिया
ढाक्याहून दुबईकडे जाणारं विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न फसला, गोळी लागून क्रू मेंबर जखमी, चितगोंगमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरु, शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजाराचा पहिला हप्ता, नांदेडमध्ये मात्र घोळ
23:44 PM (IST) • 25 Feb 2019
पुणे : मूकबधिर मुलांवर लाठीहल्ला प्रकरण, एकाही आंदोलकावर गुन्हा दाखल होणार नाही, दाखल झालेले गुन्हे तातडीनं मागे घेण्याचे राज्य सरकारचे पोलिसांना आदेश
22:18 PM (IST) • 25 Feb 2019
देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांना मंगेशकर कुटुंबाकडून मदतीचा हात, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे पाच लाख रुपये तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यातर्फे तब्बल एक कोटी रुपये
23:11 PM (IST) • 25 Feb 2019
#BREAKING पुणे : मूकबधिर मुलांवर लाठीचार्ज प्रकरण, आंदोलकांविरोधात बंडगार्डन पोलिसात दंगल माजवणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल, आंदोलकांचे नेते प्रदिप मोरेंसह दोन ते अडीच हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल, मोरेंनी आंदोलकांना चिथवल्याचा आरोप
21:28 PM (IST) • 25 Feb 2019
पुण्यातील कर्णबधिरांवर लाठीचार्ज प्रकरण, मुख्यमंत्र्यांकडून पुणे पोलिस आयुक्तांना उद्यापर्यंत सखोल तपास अहवाल सादर करण्याचे आदेश, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचेही आदेश
21:43 PM (IST) • 25 Feb 2019
मध्य रेल्वेची कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत, गुरवली रेल्वे फाटकाला टेम्पोची धडक, टिटवाळा-खडवली स्थानकादरम्यानची घटना, कसाऱ्याहून टिटवाळ्याकडे येणाऱ्या रेल्वेसेवेवरही परिणाम
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement