Hair Care Tips : 'या' कारणामुळे तुमचे केस गळतात; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hair Care Tips : आपले केस काळे आणि दाट असावेत असे प्रत्येकाला वाटते. पण कधी कधी आपले केस खूप गळायला लागतात.
Hair Care Tips : प्रत्येकाला जाड आणि सुंदर केस (Hair Care Tips) हवे असतात आणि त्यासाठी आपण केसांचे विविध प्रोडक्ट्स वापरतो. पण तरीही या सगळ्याचा आपल्या केसांवर फारसा परिणाम होत नाही. कारण आजकाल आपली बदललेली जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि आपला आहार यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतंय. केस गळणे देखील त्यापैकी एक समस्या आहे. तज्ञांच्या मते, दररोज 50 किंवा 100 केस गळणे म्हणजे ही एक सामान्य गोष्ट आहे. कारण त्यांच्या जागी नवीन केस वाढतात. पण जर एखाद्याला जास्त केस गळत असतील तर ही एक गंभीर समस्या असू शकते.
केसगळती थांबवायची असेल तर सर्वात आधी केसगळतीचे कारण जाणून घेणं गरजेचं आहे. ज्याची ओळख करून आपण केस गळण्याच्या समस्येपासून आराम मिळवू शकतो.
पोषणाच्या कमतरतेमुळे
जर तुम्ही संतुलित आहार घेतला नाही तर तुम्हाला केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तुमच्या आहारात नेहमी व्हिटॅमिन ई आणि डी, लोह आणि जस्त तसेच प्रथिने यांसारख्या पोषक घटकांचा समावेश करा.
हार्मोनल बदल
जर शरीरात अचानक हार्मोन्स बदलू लागतात किंवा हार्मोनल असंतुलन असेल तर त्यामुळे केस गळायला लागतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास होत असेल तर तुम्हाला केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
कौटुंबिक इतिहास
केस गळण्याची समस्या कौटुंबिक इतिहासामुळे देखील असू शकते. घरातील कोणत्याही पुरुषाला केस गळण्याची समस्या असेल तर त्याच्या पुढच्या पिढीलाही हा त्रास होतो.
जास्त औषधांच्या वापरामुळे
काही औषधांच्या सेवनानेही केस गळतात. कर्करोग, संधिवात, नैराश्य, हृदयविकार, उच्च रक्तदाब यांवर औषधांचे सेवन केल्याने केस गळण्याची शक्यता वाढते.
केस स्टाइलिंगची साधने
हेअर स्ट्रेटनर आणि ड्रायर सारख्या साधनांचा जास्त वापर केल्याने केसांना हानी पोहोचते किंवा केस घट्ट बांधल्याने केस ताणतात आणि ते तुटू लागतात.
तणाव किंवा नैराश्याची समस्या
जेव्हा एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून नैराश्याने ग्रस्त असते, तेव्हा त्याला केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
रेडिएशन थेरपी
काही कारणास्तव तुम्ही रेडिएशन थेरपी घेत असाल तर त्यामुळे केस गळू शकतात. अशा परिस्थितीत केस गळतात पण परत येतात.
रासायनिक प्रोडक्ट्स
केस गळणे थांबवण्यासाठी किंवा त्यांना चमक आणण्यासाठी आपण अनेक प्रकारची केमिकल उत्पादने वापरतो. पण, त्यामध्ये असणारी हानिकारक रसायने केसांना नुकसन पोहोचवतात.
काही औषधे कारणीभूत असू शकतात
जर एखादी व्यक्ती कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल आणि त्याच्या उपचारासाठी औषध घेत असेल तर त्याला औषधांमुळे केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.