New Year 2024 : नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नसाल, तर घरच्या घरी 'असं' करा नवीन वर्षाचं स्वागत
New Year 2024 : आज आम्ही तुम्हाला घरी बसून नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कसे मजेदार बनवता येईल याच्या काही टिप्स सांगणार आहोत.
New Year 2024 : नवीन वर्ष 2024 सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासठी सारेच सज्ज झाले आहेत. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी बहुतेक लोक बाहेर जातात आणि कुटुंब आणि मित्रांबरोबर पार्टी करतात. पण असे बरेच लोक आहेत ज्यांना प्रसंगी कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर पडता येत नाही. बाहेर जाण्याची इच्छा असूनही ज्यांना घराबाहेर जाता येत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला घरी बसून नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कसे मजेदार बनवता येईल याच्या काही टिप्स सांगणार आहोत.
मित्रांबरोबर घरी मूवी पार्टी करा
जर काही कारणास्तव तुम्ही मित्रांबरोबर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी बाहेर जाऊ शकला नाहीत, तर तुम्ही काही खास मित्रांना तुमच्या घरी बोलावू शकता. तुम्ही घरी बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येईल.
छान जेवण बनवा
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही घरी विविध प्रकारचे अन्न तयार करू शकता. यामध्ये तुम्ही काही खास केक आणि अनेक स्नॅक्स घरीही बनवू शकता. जर तुम्हाला हे पदार्थ कसे बनवायचे हे माहित नसेल तर तुम्ही यूट्यूबची मदत घेऊ शकता. याबरोबरच दिवसाची रंगत आणखी वाढविण्यसाठी तुम्ही कॅंडल लाईट डिनर तुम्ही या दिवशी करू शकता.
खेळ खेळा
तुम्ही घरी पाहुण्यांबरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळू शकता. मित्र आणि कुटुंबासह मजा करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही अंताक्षरी आणि पत्ते असे अनेक खेळ खेळू शकता.
नवीन वर्षाचा संकल्प करा
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे विचार, यश आणि गेल्या वर्षभरातील ज्या गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात ते लिहिण्यासाठी थोडा वेळ काढता. तसेच, येत्या वर्षात आपले ध्येय निश्चित करण्यासाठी नवीन वर्षाचे संकल्प करा आणि काही सवयी बदला.
घरबसल्या कार्यक्रम पाहा
घरात बसून लाईव्ह इव्हेंट्सचा आनंद घ्यायचा असेल, तर नवीन वर्षाच्या निमित्ताने आजकाल टीव्ही आणि यूट्यूबसह अनेक वेबसाईटवर लाईव्ह इव्हेंट्स सुरू आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही घरी बसून नवीन वर्षाचे कर्यक्रम पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.