जिऱ्याचं पाणी प्यायल्याने झटपट कमी होईल वजन; जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत
weight loss tips : जेवण तयार करताना फोडणीमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो.
Jeera Water Weight Loss : आपण अनेक पादार्थांमध्ये जिऱ्याचा वापर करतो. जेवण तयार करताना फोडणीमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्यामुळे वजन देखील कमी होते. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील फॅट्स कमी होतात. तुम्हाला जर झटपट वजन कमी करायचं असेल तर तुम्ही या प्रकारे घरच्या घरी जिऱ्याचे पाणी तयार करू शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी जिऱ्याचं पाणी तयार करण्याची सोपी पद्धत-
जिऱ्याचं पाणी तयार करण्याची पद्धत-
जीरं रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी या पाण्यात थोडी दालचिनी पावडर टाका. हे पाणी रोज सकाळी प्या. दालचिनीमध्ये अॅंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे शरीरातील ग्लूकोजची पातळी स्थिर ठेवतात.
जीरा इन्फ्यूज्ड लाइम वॉटर
लिंबूमुळे शरीरातील फॅट्स कमी होतात. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते. हे अॅसिड शरीराचे मेटाबोलिज्म वाढवते. त्यामुळे शरीरातील कॅलरीज झटपट बर्न होतात. वर्कआऊट करताना हे जीरा इन्फ्यूज्ड लाइम वॉटर प्यावे.
जिऱ्याचे पाणी आणि मेथीचे दाणे- जिऱ्याच्या पाण्यामध्ये मेथीचे दाणे टाकून हे मिश्रण गरम करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. गाळलेले पाणी दिवसातून दोन वेळा प्यावे. त्यामुळे पचन क्रिया चांगली होते आणि वजन कमी होते.
जीरे खाण्याचे फायदे
जिऱ्यामध्ये असणाऱ्या तत्वांमुळे शरीरातील फॅट्स कमी होतात. आयुर्वेदानुसार रोजच्या आहारात जिऱ्याचा समावेश करावा. जिऱ्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असेल तर चहात जिरं टाकून पिणं आरामदायी ठरतं. जिऱ्यातील घटकांमुळे कर्करोगासारख्या आजारांशी लढण्यास मदत होते, असं संशोधनातून समोर आलं आहे. जिऱ्यातील अॅक्टिव्ह कम्पाऊण्ड्समुळे ट्युमरची वाढही थांबते. जिऱ्याच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल लेव्हलला राहतं.
Katrina Kaif : कतरिनासारखी पर्फेक्ट फिगर हवीये? जाणून घ्या तिचा खास डाएट प्लॅन
टीप: कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )