Weight Loss : झटपट वजन कमी करायचंय? करा हे तीन सोपे व्यायम
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी दररोज व्यायाम देखील केला पाहिजे.
Weight Loss Tips : वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी डाएट करणे आणि व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) तुम्हाला ब्रेकफास्ट (Breakfast), लंच (Lunch) आणि डिनर (Dinner) च्या वेळांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. तसेच तुम्ही वजन कमी करण्यासाठी दररोज व्यायाम देखील केला पाहिजे. जर तुम्हाला झटपट वजन वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हे तीन सोपे व्याायम करू शकता.
लेग रेज (Leg Raise)
लेग रेज हा अत्यंत सोपा व्यायाम आहे. या व्यायामामुळे पोटाची चरबी कमी होते. हा व्यायाम करण्यासाठी बेडवर झोपा. त्यानंतर पाय एकमेकांना जवळ ठेवा आणि वर उचला. जास्तीत जास्त वेळ पाय वर ठेवण्याचा प्रयत्न करा. हा व्यायम कमीत कमी 15 मिनीट करा.
क्रंचेस (Crunches)
रोज तुम्ही क्रंचेस देखील करू शकता. दररोज 15 मिनीटं क्रंचेज केल्यानंतर तुमच्या शरीरातील चरबी कमी होईल.
हाफ गेट-अप
जर तुम्हाला सिट अप हा वर्क आऊटचा प्रकार आवडत असेल तर तुम्हाला हा एक्सरसाइज देखईल आवडेल. यूट्यूबवर तुम्ही या एक्सरसाइजचा व्हिडीओ पाहून तुम्ही हा व्यायाम घरच्या घरी करू शकता.
वर्क-आऊट झाल्यानंतर योग्य प्रमाणात प्रोटिन ड्रिंग्स प्यावेत. शरीरातील कॅलरीज बर्न करण्यासाठी तसेच बॉडी फॅट कमी करण्यासाठी रोज 30 ते 40 मिनीट हा व्यायाम केला पाहिजे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत
Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha