Wedding Tips : लग्न ठरल्याचा उत्साह, सोबत ऑफिसच्या कामाचा ताण, 'असं' करा मॅनेज! सोपे हॅक्स जाणून घ्या...
Wedding Tips : लग्नाच्या तयारीसह कामाच्या ठिकाणी कामाचे व्यवस्थापन कसे करावे? चला काही सोपे हॅक्स जाणून घेऊया
Wedding Tips : लग्न (Wedding) ठरल्याचा आनंद काही वेगळाच असतो, एकदा का लग्न ठरलं की नवरा नवरी लगेचच लग्नाच्या तयारीला लागतात, शॉपिंग असो, फोटोशूट असो किंवा पार्टी.. पण हे सगळं करत असताना जर तुम्ही जॉबला देखील असाल, तर तुमच्यावर ताण येण्याची शक्यता असते, कारण एकीकडे आपण जेव्हा लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त असतो, तेव्हा दुसरीकडे मात्र ऑफिसच्या कामाचा ताणही तितकाच असतो, कारण या लग्नाच्या तयारीच्या गडबडीत ऑफिसचे बरेच काम पेंडींग राहते. ज्याचा भार काही दिवसांनंतर येऊ शकतो. त्यामुळे वेळीच दोन्ही गोष्टी मॅनेज केल्या, तर यामध्ये समन्वय साधता येईल, लग्नाच्या वेळी ऑफिसची कामे आणि लग्नाची तयारी दोन्ही एकाच वेळी करणे अवघड होऊन बसते. अशा वेळी काही दिवस कामातून सुट्टी घ्यावी लागते. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, लग्नाची तयारी करताना तुम्ही तुमचे काम कसे सांभाळू शकता.
जोडीदाराची मदत घ्या
लग्न ठरलंय आणि जर तुम्ही लग्नाच्या तयारीत व्यस्त असाल आणि तुम्हाला ऑफिसचे काम करावे लागत असेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराची मदत घ्यावी. तुमच्या जोडीदाराला लग्नाच्या तयारीत मदत करण्यास सांगा, अगदी थोड्या काळासाठी जरी तुमच्या पार्टनरने या कामात मदत केली तर तुमचा ताण कमी होऊ शकतो. अशाप्रकारे एकत्र काम केल्यास तुम्हाला कामाच्या ठिकाणी ब्रेक घ्यावा लागणार नाही आणि लग्नाची तयारीही पूर्ण होईल.
स्वतःसाठी वेळ काढा
लग्नाची तयारी करायची असल्यास ती दिवसा करण्याचा प्रयत्न करा. अशात, तुम्ही रात्री ऑफिसचे काम करू शकता. दिवसातून किमान 2 ते 3 तास तुम्ही स्वतःसाठी काढले पाहिजेत. यासोबतच तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचीही मदत घेऊ शकता. सर्व कामे स्वत: करण्यापेक्षा काही काम करण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी. अशा स्थितीत तुमचे काम होईल आणि नुकसान होणार नाही.
तुमच्या जागी एखाद्याला पर्याय ठेवा
आपण एकाच वेळी सर्व काम करू शकत नाही. जर तुम्ही स्वतः लग्नाची तयारी करत असाल तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी कामासाठी कोणीतरी पर्याय म्हणून नियुक्त करावे लागेल, जो तुमच्या अनुपस्थितीतही सर्व कामे करू शकेल. अशा परिस्थितीत तुमचे कामही होईल आणि तुम्ही आरामात तयारी करू शकता.
कामाचा बॅकअप घ्या
तुमच्या लग्नाची तयारी सुरू करण्यापूर्वीच बॅकअप तयार ठेवावा. जर तुमच्याकडे तुमच्या कामाचा बॅकअप असेल तर तुम्ही लग्नाच्या तयारीसह तुमचे काम आरामात व्यवस्थापित करू शकता. तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुमचे काम पूर्ण होईल आणि बॅकअपमुळे तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>