Tulsi Leaves : तुळशीच्या कोरड्या पानांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या तुळशीचे फायदे
Tulsi Leaves Use : तुळशीच्या औषधी गुणधर्मामुळे तिला औषधी वनस्पती म्हणतात. या वनस्पतीमुळे सकारात्मक ऊर्जा राहते.
Tulsi Leaves Use : हिंदू धर्म मान्यतेनुसार तुळशीची वनस्पती अत्यंत पवित्र आहे. तुळशीला निव्वळ वनस्पती मानता येणार नाही. तुळशीच्या औषधी गुणधर्मांमुळे तुळशीला औषधी वनस्पती म्हणतात. या वनस्पतीमुळे सकारात्मक ऊर्जा राहते. या वनस्पतीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. तुळशीची वनस्पती ऑक्सिजन उत्सर्जित करते जी जीवनासाठी खूप उपयुक्त आहे. त्याच्या दोन प्रजाती आहेत. पांढरी आणि कृष्ण. तुळशीच्या पानांचा ज्योतिषीय उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तुळशीच्या वनस्पतीचे फायदे कोणते ते जाणून घ्या.
तुळशीच्या वनस्पतीचे फायदे
- तुळशीच्या सर्व भागांचे स्वतःचे महत्त्व आहे. बी, पानं, मूळ या सर्वांचे स्वतःचे फायदे आहेत.
- सर्दी खोकला, श्वासाची दुर्गंधी, शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणे, ताणतणाव कमी करणे, वजन कमी करणे, रातांधळेपणा, सर्पदंश, हृदयविकार, केस गळणे यामध्ये तुळशी खूप फायदेशीर आहे.
- ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप असते तेथे नेहमी सुख, शांती आणि समृद्धी राहते.
कोरड्या तुळशीच्या पानांचे महत्त्व
- तुळशीच्या हिरव्या पानांशिवाय कोरड्या पानांनाही खूप महत्त्व आहे.
- जी मुले अभ्यासात कमकुवत असतात त्यांनी पुस्तकाच्या मधोमध कोरडे तुळशीचे पान ठेवल्याने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि सकारात्मक उर्जा संचारते आणि त्यांचा अभ्यासाकडे कल वाढतो.
- तुळशीची कोरडी पाने लाल कपड्याने बांधून आपल्या घराच्या डब्यात, कपाटात किंवा तिजोरीत ठेवल्यास लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात सुख-समृद्धी येते.
- तुळशीची कोरडी पाने पाण्यात किंवा गंगाजलात मिसळून घरभर शिंपडल्यास घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते.
- कोरड्या तुळशीची पाने पाण्यात टाकून अंघोळ केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :