(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : PM मोदींनाही 'या' बेटाची भुरळ, जिथे केले त्यांनी ध्यान! भारतातील सध्या सर्वात चर्चेतलं ठिकाण
Travel : भारतातील हे ठिकाण सध्या सर्वात चर्चेतलं ठिकाण आहे, कारण पंतप्रधान मोदी या ठिकाणी ध्यानसाधनेला बसलेत, जिथे गेल्यानंतर तुम्हालाही मन:शांती लाभेल.
Travel : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ध्यान करण्यासाठी बसलेत. साधारण 30 मे ते 1 जूनपर्यंत ही ध्यान साधना असणार आहेत. खरं सांगायचं म्हणजे पंतप्रधानांनाही भारतातील सर्वात सुंदर ठिकाणी ध्यान करण्याचा मोह आवरता आला नाही, कारण यामुळे हे ठिकाण पुन्हा चर्चेत आले आहे, आज आपण जाणून घेणार आहोत, त्या ठिकाणाबद्दल जिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हालाही मन:शांती लाभेल, तसेच येथे इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत, जी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कुटुंबासोबत पिकनिकला जायचं असेल.. तर या ठिकाणी जाण्याचा प्लॅन तुम्ही नक्की बनवू शकता...
तुम्हालाही पंतप्रधान मोदींसारखे ध्यान करायचे असेल तर...
आम्ही ज्या ठिकाणाबद्दल सांगत आहोत, पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी ध्यानसाधनेला बसलेत ते ठिकाण म्हणजे कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल..जेव्हा आपण भारतातील निसर्गसौंदर्याबाबत बोलतो, तेव्हा उत्तरेला काश्मीर आणि दक्षिणेला कन्याकुमारीचा उल्लेख नक्की येतो. ही कन्याकुमारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कन्याकुमारीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये दोन दिवस ध्यान करत आहेत. या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचा मोठा पुतळा बसवण्यात आला आहे, ज्यासमोर पीएम मोदी ध्यान करत आहेत. पीएम मोदींची चिंतनशील छायाचित्रे पाहून अनेकांना या ठिकाणी जाण्याची इच्छा निर्माण झाली असेल. तुम्हालाही विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट द्यायची असेल किंवा पंतप्रधान मोदींसारखे ध्यान करायचे असेल तर तुम्ही कन्याकुमारीला येऊ शकता. येथे इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत, जी जगभरात प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया कन्याकुमारीच्या पर्यटन स्थळांबद्दल आणि विवेकानंद स्मारकाच्या ध्यान मंडपमच्या खास गोष्टी..
1892 मध्ये स्वामी विवेकानंद तीन दिवस ध्यानस्थ बसले होते..
या ठिकाणाबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात येतात. पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी ध्यान करत आहेत ते ठिकाण एका छोट्या बेटावर आहे, जे कन्याकुमारीमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. याच ठिकाणी 1892 मध्ये स्वामी विवेकानंद तीन दिवस ध्यानस्थ बसले होते, जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते. या खडकावर एका पायावर उभे राहून देवी कन्याकुमारी यांनी कठोर तपश्चर्या केली होती, असेही मानले जाते. विवेकानंद मंडपम आणि श्रीपाद मंडपम रॉक मेमोरियलमध्ये आहेत. या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. ऑक्टोबर ते मार्च हा काळ या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ आहे.
कन्याकुमारीचा समुद्र - बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्राचा संगम
कन्याकुमारी समुद्रकिनाऱ्यांसाठीही प्रसिद्ध आहे. यापैकी एक म्हणजे कन्याकुमारी बीच. हा बीच बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्राचा संगम आहे. पाण्याचे तीन वेगवेगळे रंग इथे पाहायला मिळतात. पाण्याच्या क्रियाकलापांच्या कमतरतेमुळे, या बीचच्या शांत वातावरणात सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अद्भुत दृश्य अतिशय मोहक दिसते.
तिरुवल्लुवर पुतळा
विवेकानंद रॉक मेमोरियल जवळ एक विशाल पुतळा बसवला आहे. तिरुवल्लुवर हे एक प्रख्यात तमिळ कवी आणि तत्त्वज्ञ होते, ज्यांचा 133 फूट उंच पुतळा 38 फूट उंचीवर उभा आहे. ही मूर्ती लांबून पाहता येते.
तिरुपापरापू फॉल्स
कन्याकुमारीमध्ये 50 फूट उंचीवरून थिरुपापारापू फॉल्स धबधबा आहे, ज्यामुळे ते कन्याकुमारीमधील सर्वात प्रेक्षणीय ठिकाणांपैकी एक आहे. हा मानवनिर्मित धबधबा खाली तलावात पडणाऱ्या प्रवाहांचा संग्रह आहे. धबधब्याशिवाय खाली असलेल्या तलावाच्या पाण्यातही आंघोळ करता येते. तुम्ही बोट राईड देखील करू शकता.
हेही वाचा>>>
Hidden Gem Travel : हिरव्यागार जंगलात लपलेला महाराष्ट्रातील आणखी एक धबधबा..निसर्गाची एक चित्तथरारक देणगी! जी तुम्हाला वेड लावेल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )