एक्स्प्लोर

कोरोनामुळे श्वसनाचे आजार वाढले; अवैध डास प्रतिबंधक अगरबत्त्या वापरणे थांबवा!

राज्यातील बहुसंख्य डास प्रतिबंधक अगरबत्त्या या अवैध असून आवश्यक परवाना त्यांच्याकडे नसल्यामुळे एचआयसीएने महाराष्ट्रात डास प्रतिबंधक अगरबत्त्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

मुंबई:  कोरोना महामारीमुळे श्वसनविषयक विकारांचे प्रमाण वाढले असून काही रुग्णांमध्ये ठराविक प्रमाणात तर काहींच्या बाबतीत संपूर्ण फुफ्फुसे निकामी झाली आहेत. जगभरातील वैद्यकीय तज्ञ आधीपासूनच आरोग्याबाबत निर्माण झालेली ही आपत्ती नियंत्रणात आणण्याच्या कामात गुंतलेले आहेत. होम इंन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए) हे ना-नफा तत्वावर चालविण्यात येणारे औद्योगिक मंडळ भारतात घराघरांमध्ये कीटकनाशकांचा सुरक्षीत वापर करण्याबाबत जनजागृती करते. राज्यातील बहुसंख्य डास प्रतिबंधक अगरबत्त्या या अवैध असून आवश्यक ते प्रमाणपत्र/परवाना त्यांच्याकडे नसल्यामुळे एचआयसीएने महाराष्ट्रात डास प्रतिबंधक अगरबत्त्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

अलिकडच्या सरकारी माहितीनुसार, देशभरात गेल्या एक महिन्यात १,१६,९९१ डेंग्युच्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्र, हरयाणा, केरळ, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि नवी दिल्ली या राज्यांमध्ये डेंग्युच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

लोकांना डासांपासून स्वतःचा बचाव करायचा असतो आणि त्यासाठी जवळच्या केमिस्ट, पानवाला किंवा किराणा मालाच्या दुकानातून ते डास प्रतिबंधक अगरबत्त्या खरेदी करतात. या अगरबत्त्या स्वस्तात विकल्या जातात आणि जरी त्यामुळे डासांचे प्रमाण कमी झालेले दिसून येत असले तरी त्या अवैधरीत्या बनवलेल्या असतात आणि संबंधित सरकारी विभागाकडून योग्य परवाना आणि परवानगी न घेता त्यांची विक्री केली जाते. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या बेकायदेशीर आणि बनावट अगरबत्त्यांमध्ये मान्यता नसलेल्या घातक रसायनांचा (कीटकनाशक) वापर केलेला असतो. यामुळे अस्थमा, ब्रॉंकायटिस, श्वसनमार्गाशी संबंधित आजार आणि श्वसनविषयक विकार उद्भवू शकतात. सगळ्या घरी वापरण्यासाठीच्या कीटकनाशक उत्पादकांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या सुरक्षाविषयक मापदंडाची मूलभूत तपासणी किंवा त्यांचा अवलंब या बेकायदेशीर अगरबत्त्यांचे उत्पादन करणाऱ्यांकडून केला जात नाही. 

डास प्रतिबंधक अगरबत्त्या बाजारात रिलॅक्स, कम्फर्ट, स्लीपवेल, जस्ट रिलॅक्स, रिलीफ, नॅचरल रिलॅक्स अशा अनेकविध नावांनी विकल्या जातात. या अगरबत्त्या व्यवस्थित नियामक उत्पादन आणि परवाना प्रक्रियेतून गेलेल्या नसतात. कीटकनाशक कायदा १९६८ मधील तरतुदीनुसार सर्व घरगुती कीटकनाशक उत्पादनांना केंद्रीय कीटकनाशक मंडळाची (सीआयबी) आणि नोंदणी समितीची मान्यता घेणे बंधनकारक आहे. परवानगी मिळण्याआधी त्या उत्पादनातील विषारीपणा आणि ग्राहक आणि प्राण्यांची सुरक्षितता यांचे परीक्षण केल्यानंतरच सीआयबी कडून घरगुती वापराच्या कीटकनाशक उत्पादनांना मान्यता मिळते.   

एचआयसीएचे मानद सचिव जयंत देशपांडे म्हणाले, “ज्यावेळी वरचेवर श्वसनाच्या आजारांचा त्रास होऊ लागतो तेव्हा आम्ही लोकांना डास प्रतिबंधक अगरबत्त्यांचा वापर थांबविण्याचा किंवा टाळण्याचा आग्रह करतो. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश अगरबत्त्या बेकायदेशीर असून ग्राहकांच्या आरोग्यावर त्यांचा वाईट परिणाम होतो. माहित नसलेल्या अज्ञात ज्वलनशील पदार्थांसह बनविलेल्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्यांच्या वापरामुळे अस्थमा, ब्रॉंकायटिस, श्वसनमार्गाशी संबंधित आजार आणि श्वसनविषयक विकार बळावतात. या अगरबत्त्या योग्य त्या नियामक तपासणीतून गेलेल्या नसतात आणि प्रमाणित केलेल्या पातळीपेक्षा त्यांच्यामध्ये रसायनांचे प्रमाण जास्त असते. मान्यता नसलेल्या किंवा बंदी असलेल्या रसायनांचा वापरही यात झालेला दिसून येतो. या अगरबत्त्यांमुळे डासांच्या त्रासावर प्रभावी परिणाम दिसून येत असला तरी  लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही त्या तितक्याच घातक आहेत.”

ते पुढे म्हणाले, “गेल्या 3 वर्षांत स्थानिक अधिकारी मंडळाच्या बरोबरीने देशभरात आम्ही 50 हून अधिक धाडी घातल्या. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याशी आमची बांधिलकी असल्यामुळे परवाना मंडळाकडून मान्यता मिळालेल्या ब्रँडेड डास प्रतिबंधक अगरबत्त्यांचाच वापर लोकांनी करावा असे कळकळीचे आवाहन आम्ही करत आहोत. या अगरबत्त्यांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर सीआयआर नंबरने सुरु होणारा परवाना क्रमांक आणि केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीने (सीआयबी-आरसी) आणि राज्य विभागाने जारी केलेला उत्पादन परवाना क्रमांक असणे अनिवार्य आहे. लोकं मुख्यत्वे स्वस्तात उपलब्ध असल्यामुळे डास प्रतिबंधक अगरबत्त्या खरेदी करतात. आज संघटीत उद्योगक्षेत्राने या अगरबत्त्यांना नाविन्यपूर्ण आणि सुरक्षीत पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जसे की कागदावर आधारित डास प्रतिबंधक कार्ड. अशी कार्ड मान्यताप्राप्त, परिणामकारक आणि प्रत्येक वापरासाठी एक रुपये इतक्या कमी खर्चात उपलब्ध आहेत.”

भारतात, जवळपास 50 % डास प्रतिबंधक साधने ज्वलनशील रुपात असून त्यापैकी सुमारे 30 % मान्यता नसलेल्या आणि बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्या आहेत. आपले उत्पादन बाजारपेठेत ग्राहकांसमोर सादर करण्याआधी सुरक्षाविषयक मापदंडाचा अवलंब करताना परवाना घेण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांच्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी अधिकारी मंडळाबरोबर एचआयसीए काम करत आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget