(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : रोज रनिंग करताय तर 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा...
Running and jogging : शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी धावणे म्हणजेच रनिंग आणि जॉगिंग एक उत्तम उपाय आहे. अनेक जण रोज रनिंग करतात. त्याचे अनेक फायदे आहेत.
Running and jogging : शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी धावणे म्हणजेच रनिंग आणि जॉगिंग एक उत्तम उपाय आहे. अनेक जण रोज रनिंग करतात. त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र रनिंग किंवा जॉगिंग करताना केलेल्या काही चुका आपल्याला महागात पडू शकतात.
रनिंग-जॉगिंगवेळी काय काय काळजी घ्यावी?
स्ट्रेचिंग - संशोधनानुसार स्ट्रेचिंग हे धावणाऱ्यांसाठी योग्य नाही. साधं-सोपं बसून स्ट्रेचिंगही तुमची क्षमता कमी करु शकतं. स्ट्रेचिंगमुळे स्नायू आणि मेंदू दरम्यानच्या वहनावर परिणाम होतो. त्यामुळे स्नायूंची क्षमता आणि शक्ती कमी होते.
खूप खाऊ नये
रनिंग आणि जॉगिंगपूर्वी खूप काही खाऊ नये. पोटभर खाऊन धावल्याने पचनक्रियेवर आणि रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.
खूप पाणी किंवा काहीच पाणी न पिणे
धावण्यापूर्वी खूप पाणी पिणे किंवा काहीच पाणी न पिणे हे धोकादायक आहे. धावण्यापूर्वी/धावताना थोडंस पाणी प्यावं.
फ्रेश न होणं काही
लोक रनिंग किंवा जॉगिंगला जाण्यापूर्वी फ्रेश होत नाहीत, टॉयलेटला जात नाहीत. मात्र त्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. लघवी किंवा संडासला न जाता व्यायाम करणं चुकीचं आहे.
शरीराविरोधात कृती करु नये
जर तुम्हाला धावताना शरीराची साथ मिळत नसेल, तर विनाकारण जबरदस्तीने धावू नका. शक्य होईल तितकंच धावावं. याऊलट जबरदस्तीने धावल्यास तुम्ही त्वरीत थकू शकता, तसंच तुम्हाला अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : अॅसिडिटीवर घरगुती उपाय आहे आवळ्याची 'ही' रेसिपी, नियमित सेवनाने पचनक्रिया राहील चांगली
- Health Tips : आहारात मिठाचं प्रमाण कमी करायचंय? मग 'या' टिप्स खास तुमच्यासाठी...
- वेलची खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )