वेलची खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
Healthy benifits of cardamon : आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात ज्यांचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे असतात.
Healthy benifits of cardamon : आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात ज्यांचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे असतात. यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे वेलची किंवा इलायची. चहाची चव वाढावी किंवा माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा वापर केला जातो. पण या छोट्याशा वेलचीचे इतरही अनेक फायदे आहेत. रक्तविकार, तहान, मळमळ, उचकी, कोरडा खोकला, मूत्रविकार, डोळय़ांचे विकार, केसांचे व डोक्याचे विकार, शरीराचा दाह, हृद्रोग, आर्तवविकार, मुखविकार इत्यादी विविध विकारांत वेलचीचा उपयोग केला जातो.
पाचनसंबंधी समस्य असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. पोटात जळजळ अथवा उलटी होत असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. त्यामुळेच जेवणानंतर वेलची खाण्यासाठी दिली जाते. त्याचप्रमाणे माऊथ फ्रेशनर म्हणूनही वेलचीचा वापर केला जातो. तसंच अॅसिडीटीवरही वेलची फारच उपायकारक आहे. वेलचीमध्ये असणाऱ्या रासायनिक गुणांमुळे फायदा होतो.
याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वेलचीमध्ये आवश्यक घटक असल्यानं त्यामुळे नपुंसकता, इरेक्टारइल डिस्फंक्शन और इंफर्टिलिटी यासारख्या समस्यांवर मात केली जाऊ शकते. वेलचीमध्ये आर्यन, व्हिटामिन सी, रिबोफ्लोविन आणि नियासिन यासारखे पोषक द्रव्य यात असतात. तसेच वेलचीच्या सेवनानं अॅनिमियापासूनही संरक्षण होतं. घसा दुखणं किंवा खवखव असल्यास वेलचीच्या सेवनानं नक्कीच आराम मिळतो. तसंच वेलचीच्या सेवनानं रक्ताची असणारी कमतरताही दूर होते.
नोट : वरील सर्व बाबी एबीपी माझा फक्त माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा...
संबंधित बातम्या
काय म्हणता...झोप पूर्ण होत नाही ? मग दुधात 'हा' पदार्थ मिसळा, झोपेची समस्या दूर होईल
थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे माहित आहे का? - वाचा
Weight loss Tips : वजन कमी करण्यासाठी रोज खा पिस्ता, रक्त वाढण्यासही होईल मदत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha