Muhurta 2024 : 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी बाळाच्या नामकरणासाठी अत्यंत शुभ दिवस! भगवान राम-सीतेच्या नावावर 'ही' सुंदर नावे पाहा
Namkaran Muhurta 2024 : 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्रतिष्ठापना होणार आहे, त्यामुळे हा दिवस नामकरणासाठी अतिशय शुभ आहे,
Namkaran Muhurta 2024 : 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे, त्यामुळे हा दिवस बाळाच्या नामकरणासाठी अतिशय शुभ आहे, 22 जानेवारीला प्रभू राम अनेक वर्षांनी आपल्या भव्य महालात निवास करतील. अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाच्या प्राणास पूर्ण विधीपूर्वक अभिषेक करण्यात येणार आहे. पंचांगानुसार हा दिवस नामकरणासाठीही खूप खास मानला जातो. जर तुम्हाला मुलांची नावे श्रीराम आणि देवी सीताजींच्या नावावर ठेवायची असतील तर येथे यादी पाहा, जर तुमच्या घरी एखादा छोटा पाहुणा आला असेल किंवा येणार असेल तर तुम्ही या दिवशी तुमच्या मुलाचे नाव ठेवू शकता.
तुमच्या नावाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो
असे म्हटले जाते की, नावाचा केवळ व्यक्तीच्या ओळखीवरच नाही तर त्याच्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. यामुळेच मुलाचे नाव ठेवण्यापूर्वी अनेक नावांचा विचार केला जातो. 22 जानेवारीला अयोध्येत श्री रामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. अशा स्थितीत तुम्ही बाळाचे नाव भगवान राम किंवा सीता यांच्या नावावर ठेवू शकता. श्री राम आणि सीताजींची काही अनोखी आणि सुंदर नावे जाणून घेऊया.
नामकरण मुहूर्त 22 जानेवारी 2024
शुभ तारीख - 22 जानेवारी 2024
शुभ मुहूर्त - 22 जानेवारी 2024, 07.13 सकाळी - 23 जानेवारी 2024, 04.59 पहाटे
भगवान श्रीरामांची सुंदर नावे
त्रिविकम - जो तीन जगाचे तीन चरणांमध्ये मोजमाप करतो
निमिष - भगवान रामाच्या पूर्वजांना निमिष म्हणतात.
परक्ष - परक्ष म्हणजे तेजस्वी आणि चमकदार
शाश्वत - जे कधीही संपत नाही
शनय - प्राचीन, जे सदैव टिकेल, हे शनिदेवाचे सामर्थ्य आहे.
रमित - आकर्षक, मोहक, प्रेमळ, आनंदी
अनिकृत - अनिकृत नावाचा अर्थ बुद्धिमान आणि उच्च घराण्याचा मुलगा.
देवी सीता यांची सुंदर नावे
वैदेही - वैदेही म्हणजे जो पत्नी आणि कन्या आहे आणि गुणांनी श्रेष्ठ आहे.
जानकी - राजा जनकाची मुलगी असल्याने हे नाव देण्यात आले.
मैथिली - सीताजींचा जन्म मिथिलाच्या राजाच्या घरी झाला म्हणून तिला मैथिली म्हणतात.
मृण्मयी - राजा जनक यांना सीताजी मातीत सापडल्या, म्हणून त्यांना हे नाव देण्यात आले.
सिया - चांदण्यासारखी सुंदर आणि छान
पार्थवी - पृथ्वीची कन्या आणि भूमीपासून जन्मलेली.
क्षितिजा - एक बिंदू जिथे आकाश आणि समुद्र एकत्र दिसत आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Vivah Muhurta 2024 : विवाहासाठी सर्वोत्तम मुहूर्त फेब्रुवारी 2024 मध्ये! मे, जून मध्ये मुहूर्त नाहीत? तुमच्याकडेही यंदा कर्तव्य असेल तर एकदा पाहाच...