Grahan 2023: सुर्यग्रहणानंतर पुन्हा 2023 चे शेवटचे ग्रहण होणार, 'या' राशींनी राहा सावध! जाणून घ्या
Grahan 2023: हे या वर्षातील शेवटचे ग्रहण असेल. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर याचा नकारात्मक प्रभाव पडेल.
Chandra Grahan 2023 : ऑक्टोबर (October 2023) महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप खास आहे. कारण या महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण होत आहेत. या महिन्यात एक नव्हे तर दोन ग्रहणही होणार आहेत. नुकतेच, 14 ऑक्टोबर 2023 रोजी एक सूर्यग्रहण झाले, मात्र त्यानंतरही ग्रहणाचे सावट संपलेले नाही, येत्या काही दिवसात होणारे ग्रहण हे वर्षातील शेवटचे ग्रहण असेल. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर याचा नकारात्मक प्रभाव पडेल. जाणून घ्या त्या राशींबद्दल
2023 चे दुसरे ग्रहण
या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 रोजी मध्यरात्री होणार आहे. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 01:05 वाजता ग्रहण सुरू होईल आणि 02:24 वाजता समाप्त होईल. हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल. भारतासोबतच वर्षातील शेवटचे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, उत्तर आणि पूर्व दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, अंटार्क्टिका येथेही दिसणार आहे.
चंद्रग्रहणाचे सुतक वैध असेल की नाही?
ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा ग्रहण दिसते. म्हणजे ते जिथे दिसते तिथे त्याचे सुतकही वैध असते. अशा स्थितीत 28 ऑक्टोबर 2023 च्या मध्यरात्री होणाऱ्या चंद्रग्रहणाचे सुतक देखील वैध असेल आणि ग्रहणाच्या 9 तास आधीपासून म्हणजेच 28 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 04:05 ते ग्रहण संपेपर्यंत हे सुतक वैध असेल.
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कोणत्या राशीत होईल? त्याचा काय परिणाम होईल?
ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण मेष आणि अश्विनी नक्षत्रात होईल. तो भारतात दिसत असल्याने त्याचे सुतक येथे नक्कीच स्वीकारले जाईल. याशिवाय ग्रहणाचा अनेक राशींवरही परिणाम होईल. त्यामुळे ज्योतिष शास्त्राने मेष, वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना ग्रहणकाळात काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण या राशींसाठी चंद्रग्रहण अशुभ असणार आहे. मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांना हे चंद्रग्रहण शुभ परिणाम देईल.
चंद्रग्रहणातील सुतकचे नियम
धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण आणि सुतक काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
अन्यथा, ग्रहणाचा नकारात्मक परिणाम गर्भात वाढणाऱ्या बाळावरही होऊ शकतो.
त्यामुळे यावेळी गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये, धारदार वस्तूंचा वापर करू नये, मंत्रोच्चार करावा आणि सोबत नारळ ठेवावा.
सुतक दरम्यान शिजवलेले अन्न खाऊ नये. दूध, पाणी, दही इत्यादी गोष्टींमध्ये तुळशीची पाने टाका. यानंतर, ग्रहण संपल्यानंतर तुम्ही या गोष्टी खाऊ शकता.
सुतक लावण्यापूर्वी तुळशीची पाने खुडून घ्या. कारण सुतक लावल्याबरोबर तुळशीच्या रोपाला हात लावू नका किंवा तिची पूजा करू नका.
सुतक काळात देवाची पूजाही करू नये. त्यामुळे पूजेच्या खोलीत पडदे लावा आणि ग्रहण संपल्यानंतर मंदिरात गंगाजल शिंपडा.
महत्त्वाच्या बातम्या :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Grahan 2023 Date: 2023 मध्ये किती सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या